Shiv sena News : एकनाथ शिंदेंच्या नांदेड दौऱ्यात मोठे मासे गळाला लागलेच नाहीत!

Deputy Chief Minister Eknath Shinde's Nanded tour sees no incoming news or updates. : एकनाथ शिंदे खतगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन चहापान घेणार, याचीही मोठी चर्चा झाली. प्रत्यक्षात असे काही घडलेच नाही.
DCM Eknath Shinde Aabhar Yatra News
DCM Eknath Shinde Aabhar Yatra NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा मराठवाड्यातील दुसरा आभार दौरा, त्यात शिंदेंसह गुलाबराव पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या भाषणांचीही चर्चा झाली. पण संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा फारसा लाभदायक ठरला नाही, असेच म्हणावे लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी आणि वाशिमचे जिल्हाप्रमुख वगळता पक्षाच्या गळाला नांदेडमधील एकही मोठा मासा गळाला लागला नाही.

मराठवाड्यात शिंदे (Eknath Shinde) यांचा पहिला आभार दौरा जालन्यात झाला तेव्हा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे व त्यांचे शेकडो समर्थक आणि काँग्रेसचे आठ ते दहा माजी नगरसेवक शिंदे गटात आले होते. त्यामुळे राज्य पातळीवर या आभार दौऱ्याची चर्चा झाली. नांदेडमध्ये देखील मोठे पक्ष प्रवेश होणार असे चित्र रंगवले गेले. परंतु परभणीतील उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम वगळता नांदेडमधील एकही मोठा प्रवेश पक्षात झाला नाही. मात्री मंत्री तथा काँग्रेसचे नेते भास्कर पाटील खतगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती.

एकनाथ शिंदे खतगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन चहापान घेणार, याचीही मोठी चर्चा झाली. प्रत्यक्षात असे काही घडलेच नाही. (Nanded) एकनाथ शिंदे यांनी आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर यांना आपल्या पक्षातील नेत्यानाच सर्वाधिक वेळ देत शिवसेना सदस्य नोंदणी करा, संघटना वाढवा, गाव तिथे शिवसेना आणि शिवसेनेची शाखा उभारण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. हेमंत पाटील यांच्या कामाचे कौतुक, आनंद बोंढारकर सारख्या शिवसैनिकाला आमदार कसे केले? याचा प्रवास आणि बालाजी कल्याणकर यांना साडेतीन हजार कोटींचा दिलेला निधी याचीच चर्चा शिंदेंच्या दौऱ्यात अधिक झाली.

DCM Eknath Shinde Aabhar Yatra News
BJP Vs Shivsena : शिंदेसेनेच्या 'या' मंत्र्यानं फडणवीसांविरोधात थोपाटले दंड; म्हणाले, 'अंतिम निर्णय माझाच...'

खतगावकरांचे वेट अॅन्ड वाॅच..

भास्कर पाटील खतगावकर हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत. नायगाव विधानसभा मतदारसंघात सूनबाई मिनल खतगावकर यांचा पराभव झाल्यानंतर ते पुन्हा पक्षांतराच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन खतगावकर यांनी आपला पक्ष प्रवेश निश्चित केल्याची चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यात ते धनुष्यबाण हाती घेणार अशा चर्चांना उधाण आले होते. शिंदेंकडून खतगावकरांना पक्ष प्रवेशाची आॅफर देण्यात आल्यामुळे ते चहापानासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार होते.

DCM Eknath Shinde Aabhar Yatra News
Nanded Congress News : विधानसभेला काँग्रेसचा धुव्वा उडताच अशोक चव्हाणांचे मेहुणे खतगावकर पुन्हा नव्या वाटेवर!

परंतु शिंदेंच्या आभार दौऱ्याच्या पुर्वसंध्येलाच भास्कर पाटील खतगावकर यांनी अद्याप आपला निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपल्याला पक्ष प्रवेशाचे निमंत्रण आहे. मात्र आपण अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, लवकरच या संदर्भात निर्णय घेऊ, असे सांगत खतगावकर यांची वेट अॅन्ड वाॅच ची भूमिका स्वीकारली. कदाचित यामुळेच शिंदे यांची त्यांच्याशी नियोजित असलेली 'चाय पे चर्चा' झाली नसल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com