बीड : राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तारूढ झाले त्यामुळे (Ncp) राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. १२० आमदार सोबत असतांना भाजपने उपमुख्यमंत्री पद घेतल्यामुळे राष्ट्रवादीकडून फडणवीस यांना टोला लगावला जातोय. माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहातच उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नसल्याचा उल्लेख करत फडणवीसांना डिवचले होते.
आज माजलगाव येथील मेळाव्यात धनंजय मुंडेंनी माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर दुसऱ्यांदा याचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. माजलगाव येथील कार्यकर्ता मेळावात बोलताना धनंजय मुंडे चांगलेच फार्मात आले होते.
शिंदे फडणवीस सरकारवर टीका करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. राज्यात सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. परंतु दिल्लीतील वेगवान राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. इच्छा नसताना फडणवीस यांनी वरिष्ठांचा आदेश नाराज असूनही मान्य केला आणि सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.
त्यानंतर फडणवीस व त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात नव्या सरकारवर टीका करताना धनंजय मुंडे यांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. विशेष म्हणजे आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सभागृहात उपस्थित असताना मुंडे यांनी `दादा मला माफ करा, पण उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक पद नाही`, असा उल्लेख करत फडणवीस यांना चिमटा काढला होता.
आज माजलगावच्या मेळाव्यात मुंडेंनी पुन्हा एकदा अजित पवारांसमोरच उपमुख्यमंत्री पद संवैधानिक नसल्याचा पुनरुच्चार केला. धनंजय मुंडे हे अजित दादांना वारंवार ते उपमुख्यमंत्री असलेले पद संवैधानिक नव्हते याची आठवण का बरं करून देत असतील? याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.