Amol Jadhav Arrested : घोटाळ्याची तक्रार देणारा अधिकारीच निघाला गुन्हेगार, उपायुक्त अमोल जाधव अटकेत; तब्बल 1.79 कोटींचा मुद्देमाल जप्त!

Worker Welfare Material Scam : कामगारांसाठीचे साहित्य योजनेतील साहित्य खासगी लोकांना विकून तब्बल 1 कोटी 79 लाख रुपयांचा घोटाळा प्रकरणी उपायुक्त अमोल जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
Deputy Commissioner Amol Jadhav was arrested in connection with the alleged worker material distribution scam.
Deputy Commissioner Amol Jadhav was arrested in connection with the alleged worker material distribution scam.sarkarnama
Published on
Updated on

Works Deputy Commissioner : कामगारांसाठीच्या साहित्य योजनेतील साहित्य प्रत्यक्ष कामगारांना वाटप न करता त्याची परस्पर खासगी लोकांना विकून तब्बल 1 कोटी 79 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हा कामगार अधिकारी तथा विद्यमान जिल्हा कामगार उपायुक्त अमोल जाधव याला अटक करण्यात आली आहे.

परतूर पोलीसांनी केलेल्या या कारवाईने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी असताना अमोल जाधव याने संसार उपयोगी साहित्यांच्या कीटमध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. जवळपास 100 ट्रक कीट लाभार्थ्यांना वाटप न करता ते खाजगी व्यक्तीला विकून मोठा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.

काही दिवसांपूर्वी परतूर पोलिसांत खुद्द अमोल जाधव यांनीच योजनेच्या साहित्य वाटपात गैरव्यवहार झाल्याची फिर्याद परतूर पोलिसात दिली होती. त्याचा तपास सुरु असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत अमोल जाधव यालाच अटक केली आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Deputy Commissioner Amol Jadhav was arrested in connection with the alleged worker material distribution scam.
Maharashtra News Live Update : दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय,म्हणाले, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आंदोलकांना सोडले जाणार नाही

तपास गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी

दरम्यान आतापर्यंत परतूर, यदलापूर, वाटूर परिसरातू 1 कोटी 79 लाख 11 हजार 360 रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास सुरू असून याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लाभार्थी याद्या, साहित्य वितरणाच्या नोंदी, गोदामातील साठा आणि संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याची मागणी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

Deputy Commissioner Amol Jadhav was arrested in connection with the alleged worker material distribution scam.
Hingoli Crime : जुन्या वादातून अंदाधूंद गोळीबार, एकाचा मृत्यू ; शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकासह सोळा जणांवर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com