लोकप्रतिनिधींचा विरोध, तरी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती, पांडेयजी तुम्हाला हे कसं जमलं..

आमदार शिरसाट, आता सहकार मंत्री असलेले अतुल सावे यांची मनधरणी करण्यात पांडेय यशस्वी झाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी देखील पांडेय यांचे मैत्रीपुर्ण संबंध असल्याचे बोलले जाते. (Collector, Aurangabad)
Uddhav Thackeray- Astik Pandy-Cm Shinde News, Aurangabad
Uddhav Thackeray- Astik Pandy-Cm Shinde News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या काल बदल्यांचे आदेश निघाले आणि काही आश्चर्यकारक नावे यात समोर आली. (Aurangabad) औरंगाबादेत महापालिका आयुक्त असतांना वादग्रस्त ठरलेले आणि सतत लोकप्रतिनिधींशी छत्तीसचा आकडा राहिलेले आस्तीककुमार पांडेय `पुन्हा` आले. (Collector) जिल्हाधिकारी पदावर त्यांची झालेली नियुक्ती अनेकांना धक्का देणारी ठरली.

महाविका आघाडी सरकार असतांना `हम करे सो कायदा`, अशीच काहीशी कार्यपद्धती पांडेय यांची महापालिका आयुक्त आणि नंतर प्रशासक म्हणून राहिलेली आहे. आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यांशी पांडेय यांचे कौटुंबिक संबंध होते.

औरंगाबाद दौऱ्यात दोन्ही ठाकरेंनी पांडेय यांच्या घरी आपली पायधुळ झाडली होती. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हा पालकमंत्री राहिलेले सुभाष देसाई आणि पांडेय यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या इच्छेपेक्षा त्यांना जे वाटेल तेच केल्याचे दिसून आले. त्यामुळे पांडेय यांची चर्चा चांगल्या कामापेक्षा वादामुळेच अधिक झाली.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील सायकल ट्रॅकला तेव्हा शिवसेनेत असलेले आमदार संजय शिरसाट यांनी विरोध केला होता. परंतू तो मोडत पांडेय यांनी तो ट्रॅक तयार केलाच. या शिवाय महापालिकेचे आयुक्त आणि त्यानंतर प्रशासक म्हणून पांडेय यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यात खामनदीच्या सौदर्यीकरणात वेगवेगळ्या उद्यान, तलावांना राजकीय पुढाऱ्यांची दिलेली नावे, लाखो रुपयांची उधळपट्टी स्वतःसाठी खरेदी केलेली उपकरणे यांचा समावेश आहे.

पाणी प्रश्नावर तेव्हा भाजपने रान उठवून अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. प्रशासक असलेल्या पांडेय यांनी आंदोलनाला सामोरे जात निवदेन स्वीकारावे, अशी भूमिका सावे यांनी घेतली होती. पण पांडेय यांनी ती धुडकावली होती. शेवटी सावे यांनी त्यांच्या बंगल्यासमोर जाऊन आंदोलन केले आणि या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता.

त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच लोकप्रतिनिधींशी पांडेय यांनी तेव्हा पंगा घेतला होता. कारण `ठाकरे`, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. परंतु राज्यातील सत्तातंराने सगळीच राजकीय गणित बिघडली आणि ज्यांना विरोध केला, त्यांचीच मनधरणी करण्याची वेळ पांडेय यांच्यावर आली.

Uddhav Thackeray- Astik Pandy-Cm Shinde News, Aurangabad
Latur : आता वाढप्या आपला, आमच्यापेक्षा भाजपचा पालकमंत्री झाला याचा आनंद..

जूनमध्येच पांडेय यांची महापालिका प्रशासक पदावरून सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली होती. मात्र ते तिथे रूजू होण्यास इच्छूक नव्हते. त्यानंतर त्यांची पुणे येथे सहायक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली, पण तिथेही ते रूजू झाले नाही. जून ते आॅक्टोबर दरम्यानचा वेळ त्यांनी का घेतला? हे त्यांच्या कालच्या नियुक्तीवरून स्पष्ट झाले.

ठाकरे सरकार जाऊन आता शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. औरंगाबादेतच नियुक्ती मिळावी यासाठी पांडेय यांनी या पाच महिन्यात जोरकस प्रयत्न केले. आमदार शिरसाट, आता सहकार मंत्री असलेले अतुल सावे यांची मनधरणी करण्यात पांडेय यशस्वी झाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी देखील पांडेय यांचे मैत्रीपुर्ण संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच पांडेय यांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा असलेला विरोध मवाळ झाला आणि ते जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादेत पुन्हा आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com