Suresh Dhas : सुरेश धस यांचा वेगळाच प्लॅन, भरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'या' नेत्याचे तोंडभरून कौतुक

NCP Leader Praise News : सुरेश धस यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील कार्यक्रमप्रसंगी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कौतुक केल्याने त्यांच्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु आहे.
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी भाजपमध्ये राहून आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारविरोधात रान उठवले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यानंतर सुरेश धस चर्चेत आले. त्यातच गेल्या आठ दिवसापूर्वी धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे पुढे आल्यांनतर त्यांच्यावर टीका केली जात असतानाच सुरेश धस यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील कार्यक्रमप्रसंगी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कौतुक केल्याने त्यांच्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु आहे.

आमदार सुरेश धस रविवारी परंडा दौऱ्यावर आले होते. यावेळी आमदार धस यांच्या हस्ते येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे कौतूक केले. त्यांनी आणलेल्या योजना लोकांच्या चांगल्याच पसंतीला उतरल्याचे धस यांनी म्हटले आहे.

Suresh Dhas
Shivsena UBT : इच्छुकांवर गुन्हा दाखल आहे का? पुणे महापालिकेसाठी ठाकरे गटाची 'फिल्डिंग'; भविष्यातील धोका टाळण्यासाठी घेतली मोठी खबरदारी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास विभागात वेगळेपण आणले. त्यांनी लोकांना पैसे देण्याच्या योजना आणल्या. आर. आर. पाटील यांनी फुकटच्या योजना आणल्या. त्यांनी आणलेल्या योजनेचा फायदा सर्वस्थरातील नागरिकांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Suresh Dhas
Mahayuti News : शिंदेंच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार; अजितदादांच्या शिलेदाराला मोठा दणका

सुरेश धस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना म्हणाले, तुम्ही बिगर पैशांच्या योजना आणा. पैसे द्यावा लागतील अशा योजना आणू नका. यापूर्वी अनेक लोकांनी ग्रामविकास विभाग चांगला सांभाळला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास विभागात वेगळेपण आणले. त्यांनी लोकांना पैसे देण्याच्या योजना आणल्या. आर. आर. पाटील यांनी फुकटच्या योजना आणल्या.

Suresh Dhas
Mahayuti News : युतीसाठी आम्ही कोणाच्याही मागे जाणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याने भाजपला सुनावले

कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे असले पाहिजे

तंटामुक्ती योजनात कोणाला तंटामुक्ती अध्यक्षपद मिळाले तरी लोक खुश झाले होते. जयकुमार गोरे तुम्ही तरुण आहात. तुम्ही आता आर. आर. पाटील यांच्यासारख्या वेगळ्या योजना आणा. काही फुकटच्या योजना आणा. गाव सपाटीकरणाची योजना 25 15 मध्ये समाविष्ट करा, अशी मागणी धस यांनी यावेळी मंत्री गोरे यांच्याकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप १३४ जागांवर गेली आहे. महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सारखे असले पाहिजे, असेही धस म्हणाले.

Suresh Dhas
Teacher Sanction Issues: नवीन शिक्षक संचमान्यता विद्यार्थ्यांच्या मुळावर; प्राथमिक शिक्षक संघ उचलणारं मोठं पाऊल, सरकारचीही होणार अडचण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com