Manoj Jarage Patil : देवेंद्र फडणवीसांचा मनोज जरागेंना फोन, नेमकी कशावर चर्चा?

Devendra Fadnavis phone call to Manoj Jarage Patil : मनोज जरांगे पाटील यांची भेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांचे अवकाळीने झालेल्या नुकसानी विषयी तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात तीन तास चर्चा झाली.
Devendra Fadnavis  Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarage Patil News : मनोज जरांगे पाटील यांची भेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांचे अवकाळीने झालेल्या नुकसाना विषयी तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात तीन तास चर्चा झाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनोज जरांगे पाटील यांना फोन करत त्यांच्याशी चर्चा केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करताना मी सांगितले होते की याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो. फडणवीस साहेबांचा फोन आला होता. फडणीस साहेबांना सांगितले की तुम्हाला शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी लागले. ते म्हणाले उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहोत तेथे निर्णय घेतो.

अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची पाहणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी सरसकट शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Devendra Fadnavis  Manoj Jarange Patil
Babanrao Shinde: निवडणूक न लढण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदाराला धक्का? दोन कट्टर समर्थकांनी साथ सोडली!

तब्बल तीस तास मनोज जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेविषयी सांगताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. आमच्यात तीन तास चर्चा झाली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. आमची जी चर्चा झाली ती मी कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचे देखील अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

अब्दुल सत्तार यांच्या भेटीविषयी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याबाबत मी त्यांना सांगितले आहे.मी स्वतः शेतकऱ्यांचे नुकसान पाहून आलो आहे. शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितले शेतकऱ्यांन तत्काळ सरसकट मदत मिळणे आवश्यक आहे. सरकार म्हणून मदत करण्याची आवश्यकता आहे.

शेतकरी अडचणीत

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक गेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काल (बुधवारी) ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे सरकारला आवाहन केले. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत मदतीचे आश्वासन दिले आहे.

Devendra Fadnavis  Manoj Jarange Patil
Haryana Assembly : भाजपची पहिली यादी जाहीर! 17 आमदार आणि 8 मंत्र्यांना पुन्हा संधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com