Nanded BJP V/s Congress : अशोक चव्हाण हे चिखलीकरांसाठी बूस्टर डोस; फडणवीस नेमके काय म्हणाले?

Nanded Lok Sabha Constituency : चव्हाणांनी कोणतीही अट घातली नाही, फक्त मराठवाड्याच्या विकासासाठी ते सोबत आले आहेत. चव्हाणांसारखे दृष्टे नेते सोबत आहेत. त्यामुळे चिखलीकरांना ५० टक्के मताधिक्यांनी विजयी होणार आहेत. आपण चार सौ पार जाणार आहोत, विरोधक चाळीसच्या पुढे जाणार का?
Ashok Chavan, Devendra Fadnavis
Ashok Chavan, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP Politics : गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसकडून अशोक चव्हाण हे उमेदवार होते. त्यांच्यासारखा तुल्यबळ नेता समोर असल्यामुळे आम्हाला चिंता होती, पण नांदेडकरांनी नरेंद्र मोदींच्या Narendra Modi विकासावर विश्वास दाखवत चिखलीकरांना विजयी केले.

आता अशोक चव्हाण हेच आपल्यासोबत आहेत. त्यामुळे प्रतापराव तुम्हाला बूस्टर डोस मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत तुम्हाला 43 टक्के मते मिळाली होती, आता 50 टक्के मते मिळवून विजयी व्हा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. Ashok Chavan is Booster dose of Pratap Chikhalikar.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर Pratap Patil Chikhalikar यांचा उमेदवारी अर्ज आज भव्य अशा मिरवणुकीने भरण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी ही निवडणूक देशाचा नेता ठरवणारी आहे. एका पक्षाला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, तर दुसरा पक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पाहतोय, असा टोला फडणवीस यांनी इंडिया आणि राज्यातील महाविकास आघाडीला लगावला.

अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्यासारखा नेता आपल्या पक्षात असावा असे वाटत होते. माझी त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी कुठल्याही पदासाठी नाही, तर परिवर्तनासाठी कुठल्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मान्य केले. मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देऊ नका, हीच त्यांची मागणी होती, अशा शब्दांत फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे कौतुक केले.

Ashok Chavan, Devendra Fadnavis
BJP V/s Congress : निरुपम यांची भाजपची वाट खडतर? मोहित कंबोज म्हणाले, 'काँग्रेसचा कचरा...'

नागपूर त मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्याची कल्पना जेव्हा मी मांडली तेव्हा माझ्यासोबत असणाऱ्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी हे शक्य नाही असे म्हणत विरोध दर्शवला. पण अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असतानाही या मार्गाला पाठिंबा दिला. एवढेच नाही तर नांदेडलाही समृद्धी महामार्गाशी जोडण्याची मागणी केली. त्यांची मागणी आम्ही पूर्ण करतो आहोत. राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो म्हणून ते आमच्यासोबत आले आहेत. परिवर्तन हवे असेल तर मोदीजींसोबत आले पाहिजे, असं मी म्हणालो आणि अशोक चव्हाण सोबत आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चव्हाणांनी कोणतीही अट घातली नाही, फक्त मराठवाड्याच्या विकासासाठी ते सोबत आल्याचे देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी स्पष्ट केले. रेल्वे, रस्ते असे अनेक विकासाचे प्रश्न प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाच वर्षांत सोडवले आहेत. अशोक चव्हाण यांच्यासारखे दृष्टे नेते आता त्यांच्यासोबत आहेत. मोदींनी विकसित भारताची गॅरंटी दिली आहे. पुढची पाच वर्षे देशाच्या विकासाची असणार आहेत, असा विश्वासही फडणवीसांनी या वेळी व्यक्त केला.

मोदींच्या चमत्कारामुळे आपली अर्थव्यवस्था अकराव्या क्रमाकावरून पाचव्या स्थानावर आली आहे. येत्या पाच वर्षांत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारताला पुढे आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. कोविडनंतर जगातील सगळ्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडली होती. पण मोदींच्या नेतृत्वामुळे आपण त्याकाळातही टिकून होतो, असे सांगतानाच सगळ्या समाजाच्या पाठीशी उभा राहणारा भाजप हा पक्ष असल्याचेही ते म्हणाले. आपण चार सौ पार जाणार आहोत, ते चाळीसच्या पुढे जातात का? असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Ashok Chavan, Devendra Fadnavis
Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटलांनंतर सांगोल्याचे देशमुख पवारांना भेटले; पवारांच्या मनात नेमकं काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com