Shivsena UBT News : संभाजीनगरचे श्रेय घेणाऱ्या फडणवीसांना विमानतळ नामकरणाची दानवेंनी करून दिली आठवण...

Ambadas Danve News : "विमानतळाच्या नामांतराची फाइल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही?"
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहराचे नामकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याचा दावा करता, मग विमानतळाच्या नामांतराची फाइल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. छत्रपती संभाजीनगरचे नामकरण अमित शाह यांच्या सहीने झाल्याचा दावा करत फडणवीसांनी कालच्या सभेत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

Shivsena UBT News
Chandrapur BJP News : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना अजूनही उमेदवारी मिळण्याची आशा; म्हणाले, मी मैदानात आहे !

एवढेच नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या मुख्यमंत्री पुत्राला करता आले नाही, ते अमितभाईंनी पूर्ण केले, असा दावा करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला आज ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. 'आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय घेतला आणि त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजुरी दिली,' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावर दानवे यांनी फडणवीस यांना उद्देशून समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, "संभाजीनगरचे नामांतर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये केले म्हणता, देवेंद्रजी ? मग 2014 ते 2019 सालात आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा का हा निर्णय झाला नाही ? शिवसेनेने किमान डझनभर आंदोलने केली होती," त्यात तुमचे भाजपवाले मागच्या रांगेत घोषणा द्यायचे.

Shivsena UBT News
Manchar NCP News : मंचरच्या मेळाव्यात अतुल बेनकेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, दादांना शपथविधीसाठी...

"ज्यांनी नामांतराला विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीला (NCP) सोबत घेऊन हे नामांतर उद्धवसाहेबांनी करून दाखवले म्हणून तुमचा त्या 'दुचाकी' कॅबिनेटची आग झाली होती! लोकांना हे माहिती आहे की कोणी नामांतर केलं. ती चिकलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाइल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही? हे पण जरा सांगा," असा टोलाही अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी फडणवीसांना लगावला.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com