Santosh Deshmukh Murder Case : वाँटेड कृष्णा आंधळेला पोलिसांकडून मदत? व्हिडिओ डिलिट? धनंजय देशमुख म्हणाले, 'सर्व काही अधांतरी'

Dhananjay Deshmukh Dharashiv Vashi police Krishna Andhale Beed Santosh Deshmukh murder case : बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत असताना धनंजय देशमुखांनी आता पोलिसांविषयी खळबळजनक संशय व्यक्त केला आहे.
Dhananjay Deshmukh
Dhananjay DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत त्यांच्या कुटुंबियांकडून दिवसेंदिवस वेगवेगळे आरोप होत आहे.

या गुन्ह्यात कृष्णा आंधळे अजून वाँटेड आहे. त्याला पळून जाण्यास पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा, तर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनात सापडलेल्या मोबाईलमधील व्हिडिओ डिलिट करणाऱ्याचा देखील शोध लागलेला नाही, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

बीडमधील (BEED) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाला 55 दिवस उलटले आहेत. हत्येच्या कटात 'मकोका' असलेला वाल्मिक कराड याच्यासह आठ जणांना अटकेत आहेत. परंतु हत्येतील कृष्णा आंधळे अजून 'वाँटेड' आहे. त्याचा शोध लागत नसल्यावरून मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त करताना गंभीर आरोप केले आहे.

Dhananjay Deshmukh
Shirdi Double Murder : शिर्डीतील हल्ल्याला पोलिस अपघात सांगायचे, 'त्या' तक्रारीची दखल घेतली नाही; पोलिसांच्या हलगर्जीपणावर संताप

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला पळून जाण्यास पोलिस (Police) अधिकाऱ्यांने मदत केली. हत्या प्रकरणाला 55 दिवस उलटले, तरी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. हत्येच्या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कृष्णा आंधळे याच्याविरुद्ध अगोदरच गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असताना तो स्थानिक गुन्हे शाखा अन् स्थानिक पोलिसांसोबत त्याची उठबस करत होता, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

Dhananjay Deshmukh
Top 10 News : दिल्ली विधानसभा मतदानापूर्वीच काँग्रेसचा मोठा निर्णय; काँग्रेस आमदाराच्या मुलाने केली आत्महत्या - वाचा टॉप हेडलाइन्स

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या डोळ्यासमोर असतानाही, त्यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न उपस्थित करताना धनंजय देशमुख यांनी वाशी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश घुले यांच्यावर गंभीर आरोप केले.

वाशी पोलिस ठाण्याचे रमेश घुले यांनी भर चौकात आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सोडून पळ काढला. मुख्य चौकातून आरोपींना पळ काढता येणं शक्य नाही. मग ते निसटू कसे शकले? लोक आता वाशी पोलिस ठाण्याच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले. काळ्या स्कॉर्पिओ गाडीत मिळालेल्या मोबाईलमधील व्हिडिओ कोणी आणि कधी डिलीट केले? याचा शोधही अद्याप लागलेला नाही, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com