Dhananjay Munde : 'मी येतोय, तुम्हीही या' ; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी यंदा धनंजय मुंडेंचेही आवाहन!

Pankaja Munde Dasara Melava 2024 : यंदा प्रथमच धनंजय मुंडे देखील या मेळाव्याला उपास्थित राहणार आहेत.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde Dasara Melava Bhagwangad Dhananjay Munde Will Attend: दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर भगवान गडावर राजकीय भाषण नाही, या महंतांच्या भूमिकेनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू केला.

दरवर्षी त्या आपल्या चाहत्यांना व बाबांच्या भक्तांना 'आपला दसरा, आपली परंपरा...!' 'मी येतेय तुम्हीही या' असे आवाहन करायच्या. यंदा या मेळाव्याला प्रथमच जात असलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही असेच आवाहन केले आहे.

आपल्या एक्स अकाउंट वरून त्यांनी 'चलो भगवान भक्तीगड...! आपला दसरा, आपली परंपरा...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!' अशी पोस्ट केली आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : 'दसरा मेळाव्याला जरुर या, पण...' ; पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन!

भगवान गडावरील दसरा मेळाव्याला अनेक वर्षे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जात. त्यांनी गडावर विविध पक्षांचे नेतेही आणले. तसेच आपली राजकीय दिशा स्पष्ट करताना त्यांनी येथूनच आपली ताकद देखील दाखवून दिली.

तसेच ऊसतोड मजूर आणि गडाचे भक्त व त्यांच्या चाहत्यांना देखील दिवंगत गोपीनाथ मुंडे गडाच्या मेळाव्यातून दिशाही देत. गडावरील मेळाव्यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) व धनंजय मुंडे देखील सोबत असत.

2011 सालच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत देखील उपस्थितांच्या भाषणात उल्लेख झाला होता. त्यानंतर पुढे अनेकदा धनंजय मुंडे यांनी देखील 'ज्या समाजाकडून दगड खावे लागले तेथेच फुले पडली' असे म्हटले जायचे.

Pankaja Munde
Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचा नाद करायचा नाय..! दसरा मेळाव्यासाठी तब्बल 900 एकरचं मैदान, 500 क्विंटल बुंदी अन्...

दरम्यान, 2014 साली गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाल्यानंतर महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी गडावरील व्यासपीठ काढून टाकले आणि यापुढे गडावर राजकीय भाषण नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे 2015 साली पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला आणि पुढे भगवान बाबांचे जन्मगाव सावरगाव घाट येथे मेळावा घ्यायची परंपरा सुरू केली.

त्यानंतर दसऱ्याला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) भगवान गडावर जाऊन दर्शन घेत. तर, पंकजा मुंडे दर मेळाव्यातून नवीन संकल्प करत. त्यांच्या मेळाव्यालाही गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

मात्र, यंदा प्रथमच धनंजय मुंडे देखील या मेळाव्याला उपास्थित राहणार आहेत. मागच्या वर्षी राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि राजकीय दृष्ट्या मुंडे भावंडे एकत्र आली. त्यानंतर दोघांमधील कौटुंबिक संबंध देखील सुधारले. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे ताकदीने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राहिले. आता, पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या मेळाव्याला देखील धनंजय मुंडे उपास्थित राहणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com