Pankaja Munde : 'दसरा मेळाव्याला जरुर या, पण...' ; पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन!

Pankaja Munde Dussehra Melava : भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde Politics News : 'दसरा मेळाव्याला येणाऱ्यांचे स्वागतच आहे. तुम्ही जरुर या पण काळजी घ्या.' असे आवाहन करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी समर्थकांना दिल्या आहेत. शनिवारी (ता. १२) भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. या दसरा मेळाव्याबाबत पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावरुन येणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत सूचना केल्या आहेत.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'वेळेवर निघा, वाहन कमी गतीने पळवा, सोबत दसम्या, धपाटे, चपात्या आणा. त्याच बरोबळ गुळ, साखर, मीठही सोब ठेवा. पाण्याच्या बाटल्या असू द्या. साखर, मीठ, पाण्याचे मिश्रण प्या, त्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही,असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

तसेच 'आपण भगवान बाबांसाठी, दिवंगत मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी येत आहोत. विचार संस्काराचे साेने लुटण्यासाठी येताना शांतता, शिस्त व सतर्कतेचे प्रतिक निर्माण करा.', असे आवाहनही पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी केले.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत अनेक वर्षे श्री क्षेत्र भगवान गडावर दसरा मेळावा होत असे. त्यांच्या निधनानंतर गडावर राजकीय भाषण नाही, असा निर्णय गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घेतला. त्यानंतर सुरुवातीला भगवान गडाच्या पायथ्याला मेळावा घेतल्यानंतर पुढे पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांचे जन्मगाव सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली आहे. गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्यासह अनेक नेत्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावलेली आहे. यंदाच्या मेळाव्याची देखील जोरात तयारी सुरु झाली आहे.

Pankaja Munde
Mahavikas Aghadi NCP News : जागावाटप झालेले नसताना 'मविआ'तील राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडसाठी मुलाखती घेतल्याने चर्चांना उधाण!

मेळाव्याच्या निमित्ताने संत भगवान बाबांच्या मुर्तीचे सुशोभिकरण केले जात असून यंदापासून कायमस्वरुपी बॅरिकेट्स टाकले जात असल्याची माहिती, भगवान भक्तीगड दसरा मेळावा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Pankaja Munde
Maratha Reservation : "एवढा जातीयवाद कशासाठी?" महायुती सरकारच्या 'त्या' निर्णयावरुन जरांगे पाटलांचा संतप्त सवाल

यंदा येणाऱ्यांसाठी नाष्टा, चहा, पाणी अशी सोय करण्यात आली आहे. मुक्कामी येणाऱ्यांसाठी भोजनाचीही व्यवस्था असेल. महाराष्ट्रभरात भिन्न जाती धर्माचा समूह मेळाव्याला एकत्र येणार हे या मेळाव्याचे वेगळेपण आहे.

यावेळी सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, सलिम जहांगीर, नवनाथ शिराळे, राजाभाऊ मुंडे, कल्याण आबुज, विक्रांत हजारी, माधव निर्मळ, चंद्रकांत फड, किरण बांगर, डॉ. लक्ष्मण जाधव, अशोक लोढा, ओमप्रकाश गिरी, पी. टी. चव्हाण, शांतीनाथ डोरले आदींची उपस्थिती होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com