Dhanajay Munde News : स्थानिकच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील नेते मला संपवायला निघाले होते; धनंजय मुंडेंचा विरोधकांवर गंभीर आरोप

Beed political News : परळीच्या मायबाप जनतेने या सर्व षडयंत्रांना झुगारून महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा उभा केला, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर टीका केली.
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यामुळे वातावरण तापलेले असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी राज्यातील बडे नेते केवळ एकट्या धनंजय मुंडेंना बदनाम करून संपवायला निघाले होते. मात्र, परळीच्या मायबाप जनतेने या सर्व षडयंत्रांना झुगारून महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा उभा केला, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर टीका केली.

परळी येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या धनादेशाचे वाटप आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. परळी येथील नागरिकाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आतापर्यंत तीन हजार घरकुल वाटप केले. या घरकुल वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यातील आता घरकुलांच्या लाभार्थ्यांना घरावरील पत्रे निघून छत घरावर येणार आहे. या वर्षी 677 घरकुलाचे वाटप होणार आहेत, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde
kokan train closed : कोकणाला मोठा धक्का! रत्नागिरीला जाणारी पॅसेंजर कायमची बंद; कोकणवासियांच्या नाराजीचा उद्रेक, माजी रेल्वेमंत्र्यांचा संताप

नगरसेवकांची केली कानउघाडणी

यावेळी मार्गदर्शन करीत असताना धनंजय मुंडे यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली. मागे झालेले सर्व सोडून आता प्रत्येकाचे काम तुम्हाला करायचे आहे. ज्यांनी मला मतदान केले, मी त्यांचीच कामे करणार आणि बाकीच्या मंडळींची कामे नाही करणार, असे करू नका. ही सेवा करण्याची संधी तुम्हा सर्वांना आलेली आहे. ती संधी तुम्ही सोडू नका, असे सांगत त्यांनी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना टोला लगावला.

Dhananjay Munde
Sangli ZP : राष्ट्रवादीच्या चौघांनी रातोरात उधळलं 'ऑपरेशन लोटस'; 'तिथंच' फिक्स झाला सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

नगरपालिका निवडणुका होऊन जवळपास दोन ते तीन महिने झाले आहेत. त्यामुळे नगरसेवक खुश दिसत नाहीत. तुम्ही निवडून यायला आणि नगरपालिकेचे बजेट संपायला एकच झाले आहे. मात्र, ही परिस्थिती लवकर बदलणार आहे. जे नगरसेवक निवडून आले त्यांना असे वाटत असेल की, मी माझ्या जीवावर निवडून आलो आहे, असे समजू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Munde
Prashant Bamb On Abdul Sattar : केसाने गळा नाही कापला, त्यांनीच स्वतःचा गळा आवळून घेतला; सत्तारांना काहीच माहीत नाही...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू वैद्यनाथ तीर्थक्षेत्राला तीन हजार कोटी रुपयांचा वाढीव निधी मजूर केला आहे. प्रसाद वाटपाच्या माध्यमातून केंद्रापर्यंत आपली ओळख नक्की होणार, असा विश्वास यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. परळीतील सोलार प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सरकार करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या ही योजना सरकार राबवते त्या सर्व योजना राबविण्यात येतील, असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.

Dhananjay Munde
Sangli ZP cross voting : सांगली जिल्हा परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीच्या 'त्या' सदस्यांना 'सभापती' निवड तारणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com