Dhananjay Munde : लाडकी बहीण योजनेबद्दल परळीत महिलांकडून धनंजय मुंडेंचा सत्कार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्वकांक्षी योजनेचं महिला वर्गातून स्वागत केले जात आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 7 July : महाराष्ट्र सरकारने नव्याने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्वकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. सध्या याच योजनेचा गवगवा असून महिला वर्गातून या योजनेचे स्वागत केले जात आहे.

दरम्यान, सरकारने ही योजना हाती घेतल्याबद्दल परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी व महिलांनी सरकारचे प्रतिनिधी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार केला. मुंडे यांच्या संत जगमित्र कार्यालयात परळी शहरातील महिलांनीही सत्कार केला. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

पावसाळी अधिवेशनात सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्वकांक्षी योजना जाहीर केली. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रथमच शहरात आले. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून याद्वारे आर्थिक दुर्बल कुटुंबातील महिला भगिनींना थेट दीड हजार रुपयांचे मासिक अर्थसहाय्य मिळणार आहे.

Dhananjay Munde
Uddhav Thackeray News : जरांगे, हाकेंच्या जीवाशी खेळ का करताय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

या योजनेच्या माध्यमातून परळी वैजनाथ मतदारसंघासह बीड (Beed) जिल्ह्यात जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मुंडे यांनी सर्व उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना केले.

Dhananjay Munde
Uddhav Thackeray : 'योजनांची अतिवृष्टी पण अंमलबजावणीचा दुष्काळ', उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपल्या जगमित्र या संपर्क कार्यालयात परळी ते बीड जिल्ह्यातील जनतेशी जनता संवाद उपक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी नेहमीप्रमाणे कार्यकर्ते व नागरिक आपले वेगवेगळे प्रश्न अडचणी व समस्या घेऊन मुंडे यांना भेटले. तर शक्य त्या ठिकाणी लगेचच फोन करून किंवा संबंधितांना पत्र देऊन मुंडे यांनी लोकांची कामे मार्गी लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com