Uddhav Thackeray : 'योजनांची अतिवृष्टी पण अंमलबजावणीचा दुष्काळ', उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

Uddhav Thackeray mazi ladki bahini yojana : संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिव संकल्प मेळाव्यात राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. पाप झाकण्यासाठी सरकार योजनांचा पाऊस पाडत असल्याचे ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT News : अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. सरकारने खूप योजना मांडल्या आहेत. माता बहिणांना आकर्षित करण्यासाठी डाव टाकला आहे. पण गेली दहा वर्ष मोदी सरकार सत्तेत आहे. दहा वर्षांमध्ये तुम्ही किती योजना अंमलात आणल्या, हे सांगा. योजनांची अतिवृष्टी पण अंमलबजावणीचा दुष्काळ, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला.

संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी शिव संकल्प मेळाव्यात राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. पाप झाकण्यासाठी सरकार योजनांचा पाऊस पाडत असल्याचे ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांची वीजमाफीची घोषणा सरकारने केली आहे . मात्र वीजमाफीची घोषणा करताना सरकार वीजबील थकबाकीवर काही बोलत नाही. थकबाकी देखील माफ करा, अशी आमची मागणी आहे. वीजकनेक्शन कापले जातयं आणि वीजबील भरा म्हणून सांगितले जात आहे. याचा अनुभव आपण आधी घेतला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन अजून एक आठवडा सुरू राहणार आहे. त्यामुळे वीजबील थकबाकी माफी याच अधिवेशनात करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : जरांगे, हाकेंच्या जीवाशी खेळ का करताय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

पराभव जिव्हारी लागला

कोकणातला आणि संभाजीनगरचा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. गद्दारांना सांगयला आलोय संभाजीनगर जिंकणार म्हणजे जिंकणारच. विधानसभेला संभाजीगरच्या सर्व जागांवर भगवा झळकवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लाचारांचा महाराष्ट्र नाही

महाराष्ट्राची ओळख काय असावी? महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. त्याची ओळख गद्दारांचा, लाचारांचा महाराष्ट्र होऊन देणार नाही. या गजनी सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे. ते पुन्हा सत्तेत येणार नाही, असे देखील उद्धव ठाकरेंनी ठणकावले.

Uddhav Thackeray
Rahul Gandhi : राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पहिलं पत्र; म्हणाले, ...तर तुम्हाला सहकार्य करायला मी तयार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com