Dhananjay Munde News : गोपीनाथ मुंडे यांच्याशी तुलना अन् धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी सोपवण्याचे संकेत

Dhananjay Munde has a bigger responsibility after the assembly elections : धनंजय मुंडे तुम्ही परळी पुरते नेते नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर विरोधी पक्षनेता कसा असावा ? हे धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

प्रा.प्रवीण फुटके

NCP Jan samman yatra News : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे परळी पुरते मर्यादित नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर मोठी जबाबादी देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर विरोधी पक्षनेता कसा असावा? हे धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले होते, अशा शब्दात तटकरे यांनी त्यांचे कौतुक केले. परळीत राष्ट्रवादीच्या जन सन्मान यात्रेच ग्रॅंड एन्ट्री झाली.

अजित पवार यांच्यापासून व्यासपीठावरील सगळ्याच नेत्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. राज्यात सुरु असलेली `लाडकी बहीण योजना` उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच असल्याचा दावा करत तटकरे यांनी योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. दोन महिन्याचे पैसे दिले आहेत, पुढील पैसे आम्ही दहा आॅक्टोबर पर्यंत देणार आहोत, हे पैसे स्वतःसाठी वापरा, महिलांनी सन्मानांनी राहावे यासाठीच ही योजना आणल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तर परळी विधानसभा निवडणूक मीच जिंकणार असा दावा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात धनंजय मुंडे याच्यावर पक्ष विधानसभा निवडणुकीनतर मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत दिले दिले. धनंजय मुंडे तुम्ही परळी पुरते नेते नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर विरोधी पक्षनेता कसा असावा ? हे धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले, अशा शब्दात तटकरे यांनी त्यांचे कौतुक केले.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : "भाजप सोडून जाताना आम्हाला दोष का देता?" धनंजय मुंडे कोणावर संतापले?

लाडकी बहिण नावाची योजना महाराष्ट्राला अजित पवारांनी (Ajit Pawar) दिल्याचे तटकरे म्हणाले. बीड जिल्ह्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर प्रेम करते. माझे बीड जिल्ह्यावर प्रेम, तर परळीकरांवर विशेष प्रेम आहे. तालुक्यातील वडखेल येथे लवकरच सिताफळ इस्टेट उभी करणार आहोत, जिरेवाडी येथे शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे.

शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम, आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आहे. दहाव्या अर्थसंकल्पात महिलांना समोर ठेवून योजना ठरवण्यात आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर 46 हजार कोटी रुपये खर्च करत आहोत.

Dhananjay Munde
Ajit Pawar On Nitin Gadkari : 'लाडकी बहीण' योजनेवरून गडकरींचे सरकारला चिमटे; अजितदादा म्हणतात...

केंद्रातील सरकार आपल्या विचारांचे असल्याने आम्ही म्हटल्या बरोबर कांदा निर्यातीवरील बंदी उठवली. आमच्या योजनेमुळे विरोधकांच्या पोटात मळमळ होत आहे. तुम्ही ही योजना कशी बंद करता ? ते बघू आम्हीच निवडून येणार, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com