Dhananjay Munde latest statement : जरांगेच्या टीकेवर धनंजय मुंडे वैतागले, म्हणाले, 'माझा त्यांच्या बांधाला बांध नाही, ते विरोधात का बोलतात? त्यांनाच विचारा'

Maratha reservation controversy News : सातत्याने होणारी टीका आणि आरोपांवर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
Dhananjay Munde, Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेले जवळचे संबंध, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा केलेला आरोप यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील सातत्याने धनंजय मुंडे यांची चौकशी करा, त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणी करत आहेत. सातत्याने होणारी टीका आणि आरोपांवर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझा आणि मनोज जरांगे पाटील यांचा काही बांधाला बांध नाही, किंवा माझ वावर त्यांच्या शेताला लागून नाही, तरीही ते माझ्यावर टीका, आरोप का करतात? हे तुम्ही त्यांना विचारा, मी त्यावर काय बोलणार? असे म्हणत धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर आपण अधिक बोलणार नसल्याचे सांगितले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली.

Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
BJP Politics: वाढती इनकमिंग भाजपची चिंता वाढवणारी; आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का? कार्यकर्त्यांच्या भावना

वाल्मिक कराड बेलवर बाहेर येणार या आॅडिओ क्लीपचा हवाला देत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करा, त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. सरकारकडून काहीच कारवाई होत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या बेलचा उल्लेख असलेली आॅडिओ क्लीप, जरांगे पाटील यांच्याकडून होणारी टीका यावर भाष्य केले.

Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
Pune NCP : महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट लाडकी बहीण नव्हे तर 'Gen Z'

वाल्मिक कराड बेलवर सुटणार अशी कुठली आॅडिओ क्लीप आहे, याची मला माहिती नाही. परळीच्या प्रचारसभेत मी जुन्या कार्यकर्त्यांची उणीव भासत असल्याचा उल्लेख केला त्यात चुकीचे काय? माझ्यासाठी झटणारे अनेक कार्यकर्ते हे आज हयात नाहीत, निवडणुकीच्या निमित्ताने मी त्यांची आठवण काढली किंवा त्यांची उणीव भासत आहे, असे म्हटलो तर त्यात चुकीचे काय? असे म्हणत आपण हे वाल्मिक कराडच्या बाबतीत किंवा त्याला उद्देशून बोललो असा चुकीचा अर्थ कोणी लावत असेल तर त्याला मी काय करणार? अशा शब्दात मुंडे यांनी त्यांच्यावर या विषयावरून होणारे आरोप फेटाळून लावले.

Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
Shivsena MLA Mahendra Dalvi : पैशांनी भरलेली बॅग… नोटांची मोजणी! दानवे यांच्या ‘कॅश बॉम्ब’चा स्फोट होताच, दळवींचे खुले आव्हान, म्हणाले, ‘...तर मी राजीनामा!‘

मनोज जरांगे पाटील हे वारंवार तुमच्यावर टीका का करतात? तुमचेच नाव का घेतात? यावरही माझा काही जरांगेंच्या बांधाला बांध नाही, किंवा माझ आणि त्यांच वावर एकमेकांना लागून नाही. मग ते माझे नाव का घेतात? माझ्यावर टीका का करतात? हे मी कसे सांगणार? हे तुम्ही त्यांनाच विचारा, असे म्हणत त्यांनी हा प्रश्न टोलावला.

Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
Congress Thackeray Alliance : राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी; काँग्रेसच्या देशपातळीवरील मातब्बर नेत्याचे ठाकरेंशी गुफ्तगू, मनसेवर फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com