Shivsena MLA Mahendra Dalvi : पैशांनी भरलेली बॅग… नोटांची मोजणी! दानवे यांच्या ‘कॅश बॉम्ब’चा स्फोट होताच, दळवींचे खुले आव्हान, म्हणाले, ‘...तर मी राजीनामा!‘

Eknath Shinde Shivsena MLA Mahendra Dalvi On Ambadas Danve : राज्यातील राजकारणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'कॅश बॉम्ब' टाकून खळबळ उडवून दिली आहे.
Shinde Shivsena MLA case video; Ambadas Danve, MLA Mahendra Dalvi And DCM Eknath Shinde
Shinde Shivsena MLA case video; Ambadas Danve, MLA Mahendra Dalvi And DCM Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अंबादास दानवे यांनी पैशांनी भरलेल्या बॅगचा आणि नोटा मोजतानाचा व्हिडिओ पोस्ट करून राज्यातील राजकारणात खळबळ उडवली.

  2. दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना थेट सवाल करत या पैशांचा उगम विचारला.

  3. आमदार महेंद्र दळवी यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करत, "पुरावे सिद्ध करा, नाहीतर मी आमदारकीचा राजीनामा देईन," असे खुले आव्हान दिले.

Nagpur/Raigad News : सध्या नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'कॅश बॉम्ब' टाकून खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी खळबळजनक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात, पैशांनी भरलेली बॅग आणि नोटांचे बंडल दिसली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल करताना हा आमदार कोण असा सवाल केला होता. तर हा व्हिडिओ अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांना पाठवल्याचा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत असतानाच 'हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा महेंद्र दळवी यांनी केला आहे. तर याचे पूर्ण पुरावे द्या, अन्यथा कारवाई करू असे संकेत दिले आहेत.

अंबादास दानवे यांनी 'कॅश बॉम्ब'टाकून राज्यातील राजकारण ढवळून काढले आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या खळबळजनक व्हिडिओत, ज्यात पैशांनी भरलेली बॅग आणि नोटांचे बंडल मोजताना काही व्यक्ती दिसत आहेत. यावरूनच दानवे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना थेट सवाल केला आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.

यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी अंबादास दानवे यांना पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे. असे आरोप-प्रत्योरोप सुरू असतानाच आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी'हा व्हिडिओ बनावट असून, तुम्ही पूर्ण पुरावे द्या. जर मी खोटा ठरलो तर माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन,' असे आव्‍हान या दिले आहे.

Shinde Shivsena MLA case video; Ambadas Danve, MLA Mahendra Dalvi And DCM Eknath Shinde
MLA Disqualification case : शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणानंतर आमदार अपात्रतेबाबतही मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने तारीख केली निश्चित...

त्या दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, तो व्हिडिओ कोणी केला? कसा तयार केला? आणि हे सगळं कटकारस्थान कोणी व कसं रचलं? याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मी पोलिसांत तक्रार देण्याआधी दानवेंनी पूर्ण पुरावे द्यावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईही करणार असल्‍याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

तसेच दळवी यांनी, मी जर खरंच त्या फोटोमध्ये असेल, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. सध्‍या नागपूरमध्‍ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मी या संदर्भात नक्कीच विधानमंडळात भाष्य करणार असून त्या रंगाचा टी शर्टच माझ्याकडे नाही, असाही दावा दळवी यांनी करताना, याबाबत जे काही बोलायचं आहे ते सगळं अधिवेशनातच बोलणार असल्याचेही म्हटलं आहे.

याचवेळी दळवी यांनी दानवेंवर जोरार हल्लाबोल करताना, दानवे यांचा राजकारणासाठी अशी बदनामी करण्याचा स्वभाव असून त्‍यांना तो विवादास्पद व्हिडिओ कोणी दिला त्या व्यक्तीला दानवे यांनी समोर आणावे. दानवे यांना पक्षात कोणी विचारत नसल्यानेच ते अशी कृत्य करत आहेत.

दानवे यांना माझे आव्हान असून त्यांनी लाल टी-शर्ट घातलेली ती व्यक्ती कोण? त्याचा क्लिअर फोटो आणि संभाषण (ऑडिओ) जगासमोर आणावेच. मी कधीही लाल टी-शर्ट घातलेला नाही आणि तो व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचा दावा देखील दळवी यांनी केला आहे. तर सरकारची आणि आमची बदनामी करण्यासाठी ऐन अधिवेशनाच्या काळात असे प्रकार केले जात असल्याचा आरोपही दळवी यांनी केला आहे.

दरम्यान दळवी यांनी दानवे यांच्यावर टीका करताना, त्यांचा 'बोलवता धनी' कोण आहे हे देखील त्यांनी जाहीर करावे. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केला? कोणी सुपारी दिली? याचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला नक्कीच मिळेल असाही टोला लगावला आहे. तर शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारणाऱ्या दानवेंकडे दुसरा मुद्दाच शिल्लक नसल्याने निराशेपोटी ते असे कृत्य करत असल्याचा आरोपही दळवी यांनी केला आहे.

Shinde Shivsena MLA case video; Ambadas Danve, MLA Mahendra Dalvi And DCM Eknath Shinde
Ambadas Danve : ठाकरेंच्या शिलेदाराने ऐन अधिवेशनाच्या काळात टाकला 'कॅश बॉम्ब'; आमदाराचा पैशांच्या बंडलांसोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'शिंदेजी हे आमदार कोण...'

FAQs :

1. प्रश्न: अंबादास दानवे यांनी कोणता व्हिडिओ शेअर केला?
उत्तर: पैशांनी भरलेली बॅग आणि नोटा मोजताना दिसणाऱ्या व्यक्तींचा एक खळबळजनक व्हिडिओ त्यांनी शेअर केला.

2. प्रश्न: या व्हिडिओवर महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया काय आहे?
उत्तर: त्यांनी व्हिडिओ खोटा असल्याचे म्हणत, दानवे यांनी पुरावे सिद्ध करावेत; अन्यथा ते राजीनामा देतील, असे आव्हान दिले.

3. प्रश्न: दानवे यांनी सरकारवर कोणता आरोप केला?
उत्तर: त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना या पैशांचा स्रोत आणि व्हिडिओतील व्यक्तींबद्दल प्रश्न विचारले.

4. प्रश्न: हा व्हिडिओ कधी समोर आला?
उत्तर: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असताना हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला.

5. प्रश्न: या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: ठाकरे गट आणि महायुतीतील तणाव वाढू शकतो आणि या मुद्द्यावरून मोठा राजकीय वाद उसळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com