Pune News, 10 Dec : लवकरच महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती.
त्याच पद्धतीने महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी वेगळ्या वर्गाला टार्गेट करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम राजकीय पक्षांनी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
त्यानंतर आता दुसरा टप्प्यात सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या प्रकारची रणनीती आखण्यात येईल, यावर विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार हे राजकीय पक्ष आपला महापालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करणार आहेत.
भाजपने देखील आपण घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेऊन त्याच्या आधारावर वचननामा तयार करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून त्या दृष्टिकोनातून बैठका घेण्यात येत आहेत.
मंगळवारी याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडली या बैठकीमध्ये जाहीरनाम्याची रूपरेषा निश्चित करण्यात अली आहे. याबाबत माहिती देताना शहराध्यक्ष सुनील टिंगरे म्हणाले, पुण्याच्या वाढत्या गरजा, आधुनिक शहरी आयुष्याची दिशा आणि पुढील पिढीच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार होत आहे.
वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य-शिक्षण, क्रीडा-सांस्कृतिक सुविधा, उद्याने, स्मार्ट तंत्रज्ञान, महिलांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यांसारख्या प्रमुख विषयांवर ठोस उपाययोजना यामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत.
मात्र विशेषत: युवक आणि Gen Z पिढीच्या गरजांवर लक्ष केंद्रित करत, रोजगार, नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती, आधुनिक सार्वजनिक सेवा आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शहर व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या दिशांवर समितीने विस्तृत चर्चा केली असल्याचं सुनील टिंगरे यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा म्हणजे केवळ आश्वासनांचे पान नव्हे, तर पुणेकरांच्या जीवनावर सकारात्मक बदल घडविणारी एक जबाबदार कृती-योजना आहे. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी हा जाहीरनामा प्रभावी ठरेल, अस सुनील टिंगरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.