Nashik Political News : नाशिक मतदारसंघातून विद्यमान खासदार असूनही हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळालेली नाही. गोडसे यांच्या नावावर एकमत होत नाही. त्यांना उमेदवारी मिळाल्यास महायुतीचे घटक पक्ष निवडणुकीत काम करतील की नाही, याची शाश्वती दिसत नाही. Sudhakar Badgujar targets Hemant Godse and BJP Over Nashik.
शिवसेना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एक दिलाने प्रचाराला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी प्रचारात पुढाकार घेतला. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कितीतरी पुढे निघून गेला आहे. त्या तुलनेत महायुती गोंधळलेली असून त्यांनी शिवसेनेच्या वाजे यांचा मोठा धक्का घेतला आहे, असा दावा केला.
बडगुजर यांनी खासदार हेमंत गोडसे Hemant Godse यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष काम आहे यात मोठी तफावत आहे. त्यांनी कुठलीही कामे पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळेच मतदार नाराज आहेत. याची जाणीव व महायुतीच्या नेत्यांना झाली. गोडसे यांना वेळेवर तिकीट जाहीर होऊ शकलेले नाही. त्यांच्या उमेदवारीत प्रचंड अडचणी आहेत. त्यामुळेच नव्या उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. एक उमेदवार झाला की दुसरा पर्याय उमेदवार पुढे येतो. हे महायुतीतील गोंधळाचे लक्षण असल्याची टीका बडगुजर यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बडगुजर Sudhakar Badgujar म्हणाले, महायुतीत तीनही पक्ष जागेसाठी आग्रही आहेत. तिघांकडे वेगवेगळे उमेदवार आहेत. त्यांची आजची अवस्था अतिशय गोंधळलेली आहे. खासदार गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपचे पदाधिकारी त्यांचा प्रचार करणार नाहीत. मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास खासदार गोडसे त्यांचा प्रचार करतील की नाही, याचा कोणालाच विश्वास वाटत नाही. त्यामुळे या दोन उमेदवारांव्यतिरिक्त तिसऱ्या उमेदवाराचा शोध पक्षाला करावा लागत आहे. महायुतीमध्ये या गोंधळामुळे परस्परांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीची धास्ती घेतल्यामुळेच महायुती उमेदवारीचा निर्णय करू शकलेली नाही.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपूल करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनुसार अंजनेरी हे गाव त्यांनी दत्तक घेतले होते. या गावाच्या विकासाची हमी घेतली होती. आज वस्तुस्थिती काय आहे?. अंजनेरी गावाचा काय विकास झाला? परिसरातील हेमाडपंथी मंदिरांचे पुरातन वास्तू म्हणून जतन करण्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. आजही हे काम झाल्याचे कुठेही दिसत नाही.
रेल्वे कारखान्याचे विस्तारीकरण करून 500 स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. इलेक्ट्रिक हब निर्माण स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध झाल्यात का? असा प्रश्न त्यांनी केला. खासदार गोडसे यांनी केलेल्या घोषणा प्रत्यक्षात आलेल्या नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.