Dhangar Reservation : पाण्याच्या टाकीवर उपोषण करणाऱ्या तरुणांना भेटण्यासाठी भाजप नेत्याची कसरत; थेट जिल्हाधिकाऱ्यांना लावला फोन

Dhangar reservation hunger strike Rameshrao Adaskar : भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आडसकरांना टाकीवर चढाना आणि उतराना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसले.
Dhangar reservation hunger strike Rameshrao Adaskar
Dhangar reservation hunger strike Rameshrao Adaskar sarkrnama
Published on
Updated on

Dhangar Reservation News : धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी चार तरुण सात दिवसांपासून जलकुंभाच्या टपावर मंडप टाकून उपोषण करत आहेत. जुनाट टाकीच्या छोट्या लोखंडी पायऱ्यावरुन कसरतीने चढाई करत भाजपनेते रमेशराव आडसकर यांनी या तरुणांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत (एस.टी) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील केकतसारणी येथे आनंद धायगुडे, संदिपान धायगुडे, अंकुश मन्नाडे व महादेव नरवडे हे एक जुलै पासून जलकुंभावर उपोषण करत आहेत.

आनंद धायगुडे, संदीपान धायगुडे यांनी 'शोले' स्टाईल आंदोलन केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आश्‍वासनाची पुर्तता न झाल्याने पुन्हा आता थेट जलकुंभाच्या टपावरच मंडप उभारुन उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांच्या पाठींब्यासाठी खाली बाजूलाच धरणे आंदोलनही सुरु आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. मात्र, शासनाकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. सातव्या दिवशीही रविवारी आंदोलन सुरूच असल्याने प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

Dhangar reservation hunger strike Rameshrao Adaskar
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवर उपोषण, तरुणांची प्रकृती खालावली

भाजप BJP नेते रमेशराव आडसकर यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आडसकरांना टाकीवर चढाना आणि उतराना मोठी कसरत करावी लागल्याचे दिसले. दरम्यान, त्यांनी आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांना बोलावून उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करायला लावली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून भेट देऊन सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती केली. तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांना भेटीला आणण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, आंदोलना दरम्यान पहिल्या दिवसापासून प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे हे आंदोलनाला भेट देत आहेत. आमदार नमिता मुंदडा, ऋषीकेश आडसकर व माजी आमदार पृथ्वीराज साठे, उपजिल्हाधिकारी दिपक वंजाळे यांनीही धरणे आंदोलन करणाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला.

रविवारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आंदोलनाला भेट देऊन आपल्या भावना शासनाला कळवून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी देण्यात येईल, असे सांगितले. यावरही शासनाचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांनी भेट देऊन मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

(Edited By Roshan More)

Dhangar reservation hunger strike Rameshrao Adaskar
Uddhav Thackeray News : ...अन् उद्धव ठाकरेंनी 'त्या' शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं केलं जाहीर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com