Dhangar Reservation : धनगर आणि धनगड यामध्ये संभ्रम असल्याने धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळण्यास अडचण येत असल्याचा आक्षेप धनगर समाजाचे नेते घेत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खिलारे कुटुंबातील सहा जणांकडे धनगड जातीचे दाखल होते. हे दाखल राज्य सरकारकडून रद्द करण्यात आले आहेत.
धनगड नावाची कोणीतीही जात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. महाराष्ट्रात फक्त धनगर आहेत. त्यामुळे धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी हे मोठे पाऊल असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
जात पडताळणी समितीने धनगड जातीचे दाखल दिले होते. त्यामुळे त्यांना ते रद्द करण्याचा अधिकार नव्हता मात्र आम्ही यासाठी सरकारकडे पाठपुरवा केला.त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन सांगितले की राज्यात धनगड अस्तित्वात नाही. मात्र दुर्दैवाने खिलारे कुटुंबियांनी धनगडांचे दाखले काढले होते. त्यांच्या दाखल्यात र ऐवजी ड काढून हे दाखले मिळवले. त्यांना संभाजीनगर जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर हायकोर्टात धनगड राज्यात अस्तित्वात आहेत असा आक्षेप आदिवासी नेत्यांनी घेतला होता, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
धनगर समाजातील नेत्यांकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत होत असताना मात्र सरकारला आदिवासी नेते नरहरी झिरवळ यांनी घरचा आहेर दिला आहे. धनगड दाखले रद्द करण्याच्या निर्णयाला आपण आव्हान देणार असल्याचे झिरवळ म्हणाले. आम्ही आमच्यात असलेले बोगस दाखले देखील रद्द करा अशी मागणी केली होती. मात्र, सरकारने हे आमच्या अधिकारात नसल्याचे तेव्हा सांगत हात झटकले होते. मग आता सरकारने हा निर्णय कसा घेतला? असा सवाल देखील झिरवळ यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.