Sachin Ombase News : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आता सनदी अधिकारी; धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे उकळले...

Fake Facebook Account News : कोणीही अशा प्रकारच्या मेसेजला उत्तर देऊ नये किंवा पैसे पाठवू नयेत, असे आवाहन ओंबासे यांनी केले आहे.
Sachin Ombase News : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आता सनदी अधिकारी;  धाराशिवच्या
 जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे उकळले...
Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv : ऑनलाइन फसवणूक, फेसबुकवर फेक अकाउंट काढून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याला अनेक जण बळी पडत आहेत, आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही फेक फेसबुक अकाउंट काढून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हेगारांकडून आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांनाही टार्गेट केले जात असल्याची माहिती आहे.

Sachin Ombase News : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आता सनदी अधिकारी;  धाराशिवच्या
 जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे उकळले...
Aamshya Padavi News: नंदुरबार अमली पदार्थमुक्त जिल्हा? आमदार पाडवींनी पोलिसांचा दावा खोटा ठरवला; खुलेआम विक्री

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट काढून एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. आपल्या नावे बोगस दोन ते तीन फेक अकाउंट तयार करण्यात आल्याचे सचिन ओंबासे यांनी सांगितलंय. कोणीही अशा प्रकारच्या मेसेजला उत्तर देऊ नये, किंवा पैसे पाठवू नये, असे आवाहन ओंबासे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी पु्ण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. राजेश देशमुख यांनी या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली होती. चोरट्यांनी ‘माही वर्मा’ या नावाने हे बनावट अकाउंट तयार केले होते. त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे छायाचित्र लावण्यात आले होते.

Sachin Ombase News : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आता सनदी अधिकारी;  धाराशिवच्या
 जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे उकळले...
Yashomati Thakur News: यशोमती ठाकूर-राणा यांच्यातील वाद पुन्हा भडकणार? ठाकूर म्हणाल्या, "खोटे जात प्रमाणपत्र..."

गेल्या महिन्यात अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. राकेश ओला यांच्या या अकाउंटवरून पैशाची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनता आयुक्त पंकज जावळे आदींचे बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आल्याचे समोर आले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Sachin Ombase News : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आता सनदी अधिकारी;  धाराशिवच्या
 जिल्हाधिकाऱ्यांकडून पैसे उकळले...
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार: धाराशिव, लातूरमधून इच्छुकांच्या आशा पल्लवित; चौगुले, निलंगेकर, की राणाजगजितसिंह...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com