Loksabha Election 2024 : मंत्री गावित यांचे अजब विधान; म्हणाले, मोदींनी पाठविलेल्या योजना पोहोचविण्यात कमी पडलो...

Heena Gavit नंदूरबार लोकसभा मतदारसंघात हिना गावित या उमेदवार आहेत. त्यांचाही विविध बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून मतदारसंघात प्रचार सुरू आहे.
Vijaykumar Gavit, Narendra Modi, Heena Gavit
Vijaykumar Gavit, Narendra Modi, Heena Gavitsarkarnama
Published on
Updated on

-भूषण अहिरे

Dhule News : नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूर येथे आयोजित नमो संवाद मेळाव्यात मंत्री विजयकुमार गावित यांनी अजब विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पाठविलेल्या योजना आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यात कमी पडलो आहे, अन्यथा खूप मोठं काम झालं असतं, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. तेथे प्रचार सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी महायुतीचे मंत्री प्रचारात सहभागी होत आहेत. नंदूरबार लोकसभा मतदारसंघात हिना गावित या उमेदवार आहेत. त्यांचाही विविध बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून मतदारसंघात प्रचार सुरू आहे.

शिरपूर येथे हिना गावित यांच्या प्रचारासाठी नमो संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित उपस्थित होते. या वेळी मंत्री गावित यांनी आपल्या भाषणात अजब विधान केलं.

Vijaykumar Gavit, Narendra Modi, Heena Gavit
Dhule Lok Sabha Constituency : धुळ्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीचे राजेंद्र भोसले होणार लोकसभेचे उमेदवार!

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही पोहोचविण्यात कमी पडलो आहोत. आम्ही या योजना पोहोचवू शकलो असतो तर खूप मोठं काम झालं असतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री गावित म्हणाले, जर आम्ही योजना पोहोचवू शकलो असतो, तर अशा बैठका घेत लाभार्थ्यांकडे जा, हे करा ते करा असे करण्याची वेळच आली नसती, असेदेखील विधान त्यांनी या वेळी केले. गावित यांच्या या विधानामुळे सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Vijaykumar Gavit, Narendra Modi, Heena Gavit
Vijaykumar Gavit : गावितांनी मिसळला बावनकुळेंच्या सुरात सूर, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com