Dharashiv Loksabha News : सावंतांनी दावा सांगितलेल्या धाराशीवमध्ये फडणवीसांची सभा..

Bjp : शिंदे गटाची उपस्थिती असेल तर भाजप त्याकडे पाठ फिरवितो. जिथे भाजप असते तिथे शिंदे गट जात नाही.
Dharashiv Loksabha News
Dharashiv Loksabha NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : काही दिवासांपुर्वी शिंदे गटांचे मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी धाराशीवसह राज्यातील २३ लोकसभा मतदारसंघात आम्हीच लढणार, असे जाहीर केले होते. (Dharashiv Loksabha News) त्यानंतर राज्यभरात शिंदे-भाजप लोकसभेच्या कोणत्या जागा लढवणार यावर चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर १५ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशीव दौऱ्यावर येत आहेत.

Dharashiv Loksabha News
Harshvardhan Jadhav Warn News : चढ्या दराने खत विक्री केली, तर कृषी मंत्र्यांची टोपी काढायला मागे पुढे पाहणार नाही..

फडणवीस यांची जाहीर सभा देखील या निमित्ताने ठेवण्यात आली असून (Tanaji Sawant) सावंत यांच्या दाव्याला फडणवीस कसे प्रत्युत्तर देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर गुरूवारी सायंकाळी (Devendra Fadanvis) फडणवीसांची सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जिल्ह्यात येणार असल्याने धाराशीवकरांना काय भेट देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

राणाजगजीतसिंह पाटील यांनी चार वर्षांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. (Osmanabad) या जोरावरच लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला. तेव्हा शिंदे गटाचे मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप आमदार राणा पाटील आणि मंत्री सावंत या दोन नेत्यांमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे.

फडणवीस यांच्या सभेच्या निमित्ताने या दोन नेत्यांमधील कार्यकर्त्यांमधील दरी देखील समोर आली आहे. शासन आपल्या दारीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाला शिंदे गटाची उपस्थिती असेल तर भाजप त्याकडे पाठ फिरवितो. जिथे भाजप असते तिथे शिंदे गट जात नाही, हे चित्र आहे. दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीत एकोपा दिसून येत आहे. बाजारसमिती निवडणुकीत आठपैकी पाच ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली.

त्यात ठाकरे गटाला सर्वाधिक तीन जागेवर सभापती पद मिळाले. त्यामुळे सावंतासह भाजपाला जिल्ह्यात आपले बळ वाढवावे लागणार आहे. सत्ता असली तरी दोघांमध्ये मेळ नसल्याने कार्यकर्त्यामध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. यावर फडणवीस काय तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे. महाविकास आघाडी एकोप्याने राहिल्यास भाजप व शिंदे गटासमोर मोठं आव्हान निर्माण होणार आहे.

Dharashiv Loksabha News
Cabinet Decision: कंत्राटी ग्रामसेवकांसाठी आनंदाची बातमी! वेतनात मोठी वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

बाजारसमितीमध्ये जे दिसले तेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको. त्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस सभा घेऊन वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाकरे गटाशी एकनिष्ट राहिलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा वाढता जनसंपर्क व महाविकास आघाडीची शक्ती याला भाजप व शिंदे गट कसे तोंड देणार ? हे पाहवे लागणार आहे.

केंद्र व राज्य दोन्हीकडे सत्ता असल्याने पुढील एक वर्षात जिल्ह्याच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करुन जनतेसमोर जाण्याचा पर्याय भाजप स्विकारेल असे दिसते. विकासकामापासुन कोसो दुर असणाऱ्या व मागास जिल्ह्याच्या यादीत असलेल्या धाराशिवला पुढील काळात काय मिळणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com