Harshvardhan Jadhav Warn News : चढ्या दराने खत विक्री केली, तर कृषी मंत्र्यांची टोपी काढायला मागे पुढे पाहणार नाही..

BRS : ईपीएस प्रणालीचा अहवाल दिला नाही तर कृषी सहाय्यक आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सटकावल्या शिवाय शांत बसणार नाही.
Harshvardhan Jadhav Warn News : चढ्या दराने खत विक्री केली, तर कृषी मंत्र्यांची टोपी काढायला मागे पुढे पाहणार नाही..
Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : बोगस, खत बियाणे विक्रेत्यांच्या दुकानावर अकोला येथील पथकाने धाडी टाकल्याचे व त्यावरून वसुलीचे आरोप होत असतांना आता शेतकऱ्यांना अतिरिक्त दराने खत विक्री होत असल्याचा आरोप बीआरएसचे हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. (Harshvardhan Jadhav Warn News) हा आरोप करतांनाच चढ्या दराने खत विक्री करणाऱ्यांना आवरा नाही तर कृषी मंत्र्यांची टोपी काढायला देखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

Harshvardhan Jadhav Warn News : चढ्या दराने खत विक्री केली, तर कृषी मंत्र्यांची टोपी काढायला मागे पुढे पाहणार नाही..
Dispute in BJP-Shivsena : शंभर आमदारांचा भाजप ‘राष्ट्रात नरेंद्र, महाराष्ट्रात शिंदे’ स्वीकारणार का?; फडणवीसांचे काय होणार

राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदीचा प्रश्न गंभीर बनला असतांना जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी पुढाकार घेत कन्नड-सोयगाव तालुक्यातील कांदा तेंलगणा राज्यात नेवून विकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. (Abdul Sattar) ग्रेडनूसार या कांद्याला एक हजार ते अठराशे रुपये भाव तेलंगणा मार्केट कमिटीमध्ये देण्यात येत असल्याचा दावा देखील जाधव यांनी केला आहे.

केवळ कन्नडच (Kannad) नाही तर राज्यातील विविध भागातून तेलंगणात कांदा विक्रीसाठी बीआरएसकडून मदत केली जात आहे. आता जाधव यांनी मतदारसंघा चढ्या दराने विक्री होत असलेल्या खत, युरियाचा प्रश्न हाती घेतला आहे. जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत कृषी केंद्र सहाय्यक तसेच कृषी विभागाला जाब विचारत येत्या दोन दिवसात कृषी केंद्रातील ईपीएस प्रणालीचा अहवाल देण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारकडून आलेला युरिया, खत किती, कुणाला, कधी आणि कुठे वितरित केले याची नोंद प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या ईपीएस सिस्टीममध्ये असते. तरी देखील काही विक्रेते हे युरिया, खत जास्त भावानी विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दोन दिवसांत ईपीएस प्रणालीचा अहवाल दिला नाही तर कृषी सहाय्यक आणि संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सटकावल्या शिवाय शांत बसणार नाही. एवढेच नाही, तर कृषी मंत्र्यांची टोपी काढायला देखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com