Dharashiv Loksabha : मुख्यमंत्र्यांसमोर गटबाजीचे प्रदर्शन टाळण्यासाठी आरोग्यमंत्र्यांची शक्कल...

Tanaji Sawant's shivsena meeting : पुतण्या धनंजय याच्यासह माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड या लोकसभेसाठी दोन्ही इच्छुकांचे फोटो स्वागताच्या बॅनरवर.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या दि. 7 रोजी होणारा धाराशिव दौरा अनेक अर्थाने चर्चिला जात आहे. ही लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गट लढवणार म्हणून मुख्यमंत्री येत आहेत, शिवसैनिकांना बळ देत आहेत, अशा चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तर मुख्यमंत्र्यांच्यासमोर जिल्ह्यातील गटबाजी किंवा नाराजीचे प्रदर्शन घडू नये, यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत हे विशेष काळजी घेताना दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंत यांनी आपला पुतण्या धनंजय सावंत याच्यासह माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचाही फोटो आवर्जून छापला आहे. या दोघांकडेही धाराशिव लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जाते. महायुतीचा उमेदवार कोण असेल याचे चित्र स्पष्ट करणारा दौरा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या मेळाव्याकडे पाहिले जात आहे.

Tanaji Sawant
Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून ठाकरेंचा उमेदवार ठरला

महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नुकतीच जिल्हा समन्वय समिती स्थापन केली. या समितीने तालुका, गाव पातळीवर कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करून घराघरात महायुतीच्या ध्येयधोरणांचा आणि विचारांचा वारसा पोहोचवायचा, असे ठरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्याच मेळाव्यात माजी खासदार रवींद्र गायकवाडांना बोलण्याची संधी दिली नाही. आता त्यांची नाराजी घालविण्यासाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यकर्ता मेळाव्याच्या डिजिटल बॅनरवर गायकवाडांना स्थान दिले. तसेच पुतण्या धनंजय सावंत याचाही फोटो बॅनरवर झळकल्यामुळे उमेदवारीची लॉटरी कोणाचीही लागली तरी दोघेही आपलेच! हाच हेतू या मागे असल्याची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव जिल्ह्यातील ढोकीच्या तेरणा कारखान्यावर उद्या बुधवारी कार्यकर्ता मेळावा होणार आहे. हा कारखाना म्हणजे एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू होता. ऐतिहासिकदृष्ट्या या ठिकाणी 'मिशन - 48' शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचे हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. हा मेळावा म्हणजे सावंत कुटुंबीयांच्या राजकीय उध्दाराचा पहिला प्रयोग मानला जात आहे.

कारण या मेळाव्याच्या अगोदरच पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी आपल्या वर्तुळातील कार्यकर्त्यांकडून लोकसभा उमेदवारी मिळाली यासाठी थेट ग्रामपंचायतींचेच ठराव घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी श्रीक्षेत्र सोनारीच्या काळभैरवनाथाच्या यात्रेत धनंजय सावंत यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर झळकावले.

धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनीही मागील काही महिन्यापूर्वी धाराशिव येथे पत्रकार परिषद घेवून पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यादृष्टिने त्यांनी जिल्ह्यातील तालुका व जिल्हा परिषद गटनिहाय दौरे व बैठकाही घेणे सुरू केले होते. मात्र 14 जानेवारी रोजी महायुतीच्या पहिल्या समन्वय मेळाव्यात मिठाचा खडा पडला आणि गायकवाड नाराज झाले.

त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पुतण्याच्या उमेदवारीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी डिजिटल बॅनरवर माजी खासदारांना मोठा मान देण्यात आला आहे. त्यामुळे गायकवाडांची नाराजी खरचं दूर झाली का? हे लवकरच स्पष्ट होईल. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना जर शिंदे गटातून उमेदवारी मिळाली तर तानाजी सावंत आपली ताकद गायकवाडांच्या पाठीशी लावणार का? असाही सवाल कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.

(Edited by Amol Sutar)

Tanaji Sawant
Satara NCP News : जयंत पाटील म्हणाले, पर्याय नाही ; तर परतफेडीचा शशिकांत शिंदेंनी कोणाला दिला इशारा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com