Dharashiv ZP News : धाराशीवमध्ये माजी अध्यक्ष, सभापतींचे गटच झाले आरक्षित; अर्चना, शरण पाटलांना पुन्हा संधी!

Local Body Election Reservation : जिल्हा परिषदेचे एकूण 55 गट आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी नऊ, अनुसूचित जमातीसाठी एक, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 16 गट आरक्षित आहेत.
Dharashiv Zilla Parisad Reservation News
Dharashiv Zilla Parisad Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरक्षणात माजी अध्यक्ष आणि सभापती असलेल्या गटांना आरक्षण लागू झाले आहे.

  2. अर्चना पाटील आणि शरण पाटील यांना पुन्हा निवडणुकीची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

  3. या निर्णयामुळे धाराशिवच्या राजकारणात नव्या हालचाली आणि चर्चा सुरू झाल्या आहेत.

Local Body Election 2025 : अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर काल जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गणांचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षण कायम राहिले त्या इच्छूकांची तयारी जोरात सुरू झाली आहे, तर महिला किंवा इतर आरक्षणामुळे पंचाईत झालेल्या अनेकांवर धावाधाव करण्याची वेळ आली आहे. धाराशिवमध्ये माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापतींचे गट आरक्षित झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

यात प्रामुख्याने गेल्या वेळी वडगाव (सिद्धेश्‍वर) गटातून निवडून आलेले नेताजी पाटील (भाजप) हे जिल्हा परिषदेचे (Zilla Parisad) अध्यक्ष झाले होते. त्यांचा गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला आहे. माजी अध्यक्ष ॲड. धीरज पाटील (काँग्रेस) यांचाही सिंदफळ गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला आहे. गेल्या वेळी काँग्रेसमधून निवडणूक लढविलेले आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रकाश आष्टे यांचा कुन्हाळी गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना सुरक्षित गट शोधावा लागणार आहे.

माजी सभापती अभय चालुक्य (भाजप) यांचा तुरोरी गट यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांनाही सुरक्षित गट शोधावा लागणार आहे. कुन्हाळी व तुरोरी गटांतून यावेळी विविध पक्षांतील काही दिग्गजांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे गेल्या वेळी बलसूर गटातून निवडून आले होते. यावेळी त्यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित (Reservation) झाल्याने त्यांनाही दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.

Dharashiv Zilla Parisad Reservation News
Zilla Parishad Election: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पुन्हा लांबणीवर? कोर्टात सरकारविरोधात याचिका

माजी सदस्य संदीप मडके यांचा मोहा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी, मदन बारकूल यांचा येरमाळा गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी, माजी सदस्य राजकुमार पाटील यांचा काटी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाला आहे. माजी सदस्य ज्ञानेश्‍वर गिते यांचा ईट गट सर्वसाधारण महिलेसाठी, माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांचा जळकोट गट आणि माजी सभापती धनंजय सावंत यांचा अनाळा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. 15 माजी सदस्यांचे गट विविध प्रवर्गांसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे.

Dharashiv Zilla Parisad Reservation News
Latur ZP Reservation News : लातूर जिल्हा परिषदेतील एन्ट्रीसाठी इच्छूक कामाला, आरक्षणामुळे संधी हुकलेले पर्यायांच्या शोधात!

जिल्हा परिषदेचे एकूण 55 गट आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी नऊ, अनुसूचित जमातीसाठी एक, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 16 गट आरक्षित आहेत. एकूण गटांपैकी विविध प्रवर्गातील महिलांसाठी 28 गट आरक्षित झाले आहेत. या सोडतीने विविध पक्षांतील दिग्गजांना धक्का दिला आहे. यामध्ये दोन माजी अध्यक्षांचाही समावेश आहे.

दोन प्रस्थापितांना पुन्हा संधी

गेल्या वेळी तेर गटातून निवडून आलेल्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचा तेर गट सर्वसाधारण महिलेसाठी, तर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांचा आलूर गट यावेळी सर्वसाधारण राहिला आहे. त्यामुळे या दोघांनाही या गटातून निवडणूक लढविण्याची दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली होती.

त्यानंतर राज्यात झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असलेल्या 16 गटांमध्ये चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.

गटनिहाय आरक्षण

अनुसूचित जाती- सांजा, काक्रंबा, खामसवाडी, शहापूर. अनुसूचित जाती महिला- सिंदफळ, वडगाव (सिद्धेश्‍वर), डिकसळ, येरमाळा, सास्तूर. अनुसूचित जमाती- ढोकी. नागरिकांचा मागासप्रवर्ग- उपळा (मा.), काटगाव, शिराढोण, पळसप, येडशी, मंगरूळ (ता. कळंब), पाथरुड. नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला- वालवड, काटी, येणेगूर, मोहा, लोणी, तुरोरी, सुकटा. सर्वसाधारण महिला- बलसूर, जेवळी, कुन्हाळी, कदेर, माकणी, अनाळा, मंगरूळ (ता. तुळजापूर), तेर, ईट, कानेगाव, केशेगाव, जळकोट, पारा, पारगाव, कोंड, अंबेजवळगा. सर्वसाधारण- नंदगाव, आष्टा, डोंजा, नायगाव, गुंजोटी, पाडोळी (आ.), तेरखेडा, अणदूर, इटकूर, जवळा (नि.), दाळिंब, आलूर, कवठा, बेंबळी, शेळगाव.

1. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरक्षणात काय बदल झाले आहेत?
काही गट महिला व मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाल्याने माजी अध्यक्ष, सभापतींचे गट पुन्हा आरक्षित झाले आहेत.

2. अर्चना पाटील आणि शरण पाटील यांना पुन्हा निवडणुकीत संधी मिळेल का?
होय, त्यांच्या गटांवर आरक्षण आल्याने दोघांनाही पुन्हा निवडणुकीत उतरता येणार आहे.

3. धाराशिव जिल्ह्यात या आरक्षणामुळे कोणाला नुकसान झाले?
काही विद्यमान इच्छुक उमेदवारांना आपले गट आरक्षित झाल्याने निवडणूक लढविण्याची संधी गमवावी लागणार आहे.

4. आरक्षण बदलामुळे स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार?
आरक्षणामुळे स्थानिक समीकरणे बदलली असून अनेक पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे.

5. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुका केव्हा होणार आहेत?
निवडणुकीची तारीख अधिकृतरीत्या घोषित झालेली नसली तरी लवकरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com