Bageshwar Baba : 'आतंकवाद हा कॅन्सर पेक्षा जास्त धोकादायक'

Bageshwar Baba on 'Terrorism : परभणीत आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथा कार्यक्रमांचे आयोजन
Dhirendra Krishna Shastri
Dhirendra Krishna ShastriSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : आपल्या विधानाने सतत वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आतंकवाद या विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. आतंकवाद हा कँसर पेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याला तातडीने प्रतिबंधित केले नाही तर तो संपूर्ण देशाला उध्वस्त करेल त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.परभणी येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेचे आयोजन शिवसेना (उबाठा) खासदार संजय जाधव यांनी केले आहे.

राष्ट्रीय तपास संस्था व दहशतवाद विरोधी पथकाने मुंबई जवळील एका गावात आयएसआयएस या आतंकवादी संघटनेचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसेच या गावात सिरीया मॉडेल स्थापन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, आतंकवाद, धर्मांतर यांच्यावर शासनाने तातडीने निर्बंध आणले पाहिजे. हिंदू धर्मातील युवा जागृत होत असल्यामुळे लव्ह जिहाद सारखे प्रकार कमी होत आहेत. लवकरच ते शून्यावर येतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhirendra Krishna Shastri
BJP 'INDIA' Politics : भाजपाची तिरकी चाल ; 'इंडिया' बाबत मोठा निर्णय

मराठा युवकांनी आत्महत्या करू नयेत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील युवक आत्महत्या करत आहेत. त्यांनी असे कृत्य करू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळेल. जाधव यांनी सप्टेंबर मध्ये त्यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन केले होते. त्यास भाविकांनी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रसिद्ध कथाकार बागेश्वर धाम सरकारचे आचार्य धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेचे आयोजन करण्यात आले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com