Raju Shetti News : नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर राजू शेट्टी म्हणाले, 'जरा वेश बदलून लोकांमध्ये जा...'

Swabhimani Shetkari Sanghatana: ऊस दरवाढीच्या मागणीसाठी परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : राज्याच्या सत्तासंघर्षावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा राजकीय असून तो संविधानाला धरून नसल्याचा आरोप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ऊस दरवाढीच्या मागणीसाठी परभणीमध्ये रास्ता रोको आंदोलनासाठी ते आले होते.

यावेळी माध्यमांनी शेट्टी यांना राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रश्न विचारला. तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी स्वतःबद्दलच्या लोकांमध्ये असलेल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असतील तर वेश बदलून फिरावे, असा टोला लगावला. राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला, तो राजकीय, चुकीचा आणि संविधानाचा विचार न करता दिलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Shetti
Dharashiv Loksabha : मैदानात तर या..! ओमराजेंनी भाजपला दिले आव्हान...

सत्ताधारी भाजपने इतर राजकीय पक्षातील नेत्यांना ऑफर देण्यापेक्षा जे वर्षानुवर्षे पक्षात प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करीत आहेत, त्यांना मोठं केलं पाहिजे, असा सल्लाही शेट्टी यांनी यावेळी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय? असा प्रश्न विचारला तेव्हा आमचे बुलढाण्याचे नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचे सांगितले आहे, असे म्हणत त्यांनी त्यांच्या उमेदवारीला एकप्रकारे हिरवा कंदीलच दाखवल्याचे बोलले जात आहे.

राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि मुंबईत धडक देण्याची सुरू असलेली तयारी यावरही शेट्टी यांनी भाष्य केले. मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे, त्यांनी मुंबईत धडक देणे सरकारला आणि राज्याची आर्थिक राजधानी मुंबईलाही परवडणार नाही. त्यामुळे सरकारने 20 जानेवारीपूर्वीच आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाची दिशाभूल न करता 52 टक्क्यांची मर्यादाच या सरकारने काढून टाकावी, अशी मागणीही शेट्टी यांनी यावेळी केली.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Raju Shetti
Nanded Loksabha Constituency : मीनल खतगावकर लोकसभेसाठी तयार.. पण साहेबांनी आदेश दिला तरच..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com