Nanded Loksabha Constituency : मीनल खतगावकर लोकसभेसाठी तयार.. पण साहेबांनी आदेश दिला तरच..!

Political news : अशोक चव्हणांना दिल्लीपेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त रस
meenal Khtgokar, ashok chavhan
meenal Khtgokar, ashok chavhan Sarakarnama

Nanded news : नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्व शक्तिनिशी लढणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या थेट लढाईत नांदेड लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु त्यांना दिल्लीपेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त रस असल्याचे बोलले जाते.

अशावेळी काँग्रेसने दुसरा पर्याय म्हणून माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या स्नूषा डाॅ. मीनल खतगावकर यांना अलर्ट मोडवर राहायला सांगितले आहे. स्वतः मिनल खतगावकर यांनी साहेबांनी आदेश दिला तर आपण नांदेड लोकसभा मतदारसंघातून लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. नायगाव, देगलूर, बिलोली, मुखेड या भागात त्यांनी संपर्क अभियानही सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.

meenal Khtgokar, ashok chavhan
Sushilkumar Shinde : बड्या नेत्याकडून मला अन् प्रणितीला भाजप प्रवेशाची ऑफर, पण...; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

यावरून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी बी प्लान तयार ठेवला असल्याचे दिसते. जर अशोक चव्हाणांनी निवडणूकीतुन माघारी घेतली तर मीनल पाटील खतगावकर ह्याच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित समजले जात आहे. उमेदवार कोण? हे अद्याप निश्चित नसले तरी काँग्रेसने निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. तालुका निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे, निवडणुकीतील चुका सुधारून संघटनात्मक पातळीवर काम वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मतदान केंद्रनिहाय सुक्ष्म असे नियोजन करतांना स्वतः अशोक चव्हाण यांनी यामध्ये लक्ष घातले आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारच्या तोडीस तोड उमेदवार द्यायचा ठरले तर अशोक चव्हाण हा एकमेव पर्याय काँग्रेस समोर आहे. पण त्यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिला आणि तो काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी मान्य केला तर मग डॉ. मीनल पाटील यांचे नाव चव्हाण यांच्याकडूनच पुढे केले जाऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये झालेली घरवापसी त्यादृष्टीने महत्वाची ठरणार आहे. खासदार, आमदार, मंत्री राहिलेले भास्कर पाटील खतगांवकर हे अनुभवी आणि जिल्ह्यात पकड असलेले नेते आहेत. सध्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा जनसंपर्क व राजकीय अनुभव लक्षात घेता डॉ. मीनल पाटील यांना उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्येच होतांना दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मीनल पाटील खतगावकर (Meenal Patil) ह्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात, काँग्रेसच्या पक्षाच्या बैठका, मेळाव्यात त्या आवर्जून उपस्थित राहत असल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे. नागपूर येथे झालेल्या काँग्रेस स्थापनादिनाच्या सभेला देगलूर, बिलोली, मुखेड या भागातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने गेले होते.

काँग्रेसचे पदाधिकारी लागले कामाला

भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी नियोजन सुरू करत भाजपला आव्हान दिले आहे. उमेदवार कोण असेल यापेक्षा नांदेडची जागा जिंकायची या निर्धाराने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

(Edited By sachin waghmare)

meenal Khtgokar, ashok chavhan
Ashok Chavhan : "सामान्य लोकांचा पैसा बुडणार असेल तर.." ; अदानी प्रकरणी चव्हाण काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com