Jalna : आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात केला.
यावरून वातावरण तापलेले असतांना महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मात्र फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले. माझ्या गृहमंत्री पदाच्या काळात असा प्रकार घडलेला नाही आणि अशी कोणतीही योजना आमच्या सरकारने आखली नव्हती. (Devendra Fadanvis) फडणवीस काय बोलले हे मी ऐकलेले नाही, अशा शब्दात वळसे पाटील यांनी फडणवीसांचा दावा खोडून काढला.
ते जालना येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आले होते. प्रसार माध्यमांनी फडवणीसांच्या आरोपबद्दल विचारले असता ते म्हणाले, फडणवीस यांनी जे काही आरोप आमच्या सरकारवर केले आहेत, याबाबत त्यांच्याकडे काय माहिती आहे ? ते कशाचा आधारे बोलले हे माहित नाही. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये असा कोणताही प्रकार झालेला नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालावधीत मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता.
माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा, मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आले होते असा आरोप केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अटकवा असे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी देण्यात आले होते.
पण मी कोणतंही काम तसं न केल्यामुळे त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही, असे म्हटले होते. मात्र यावर अधिक भाष्य न करता वळसे पाटील यांनी आपण गृहमंत्री असतांना असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.