Deshmukh-Nilangekar : देशमुख- निलंगेकरांच्या भेटीची लातूर जिल्ह्यात चर्चा!

Latur Loksabha Constituency : लातूरात काळगेंच्या विजयाचा निलंगेकर यांना व्यक्त केला विश्वास..
Deshmukh-Nilangekar
Deshmukh-NilangekarSarkarnama
Published on
Updated on

loksabha Election 2024 : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडली. लातूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डाॅ. शिवाजी काळगे आणि महायुतीचे सुधाकर श्रृंगारे यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले गेले.

परंतु 7 मे रोजी लातूरसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मराठवाड्यातील शेवटच्या टप्पात मतदान झालेल्या बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात सक्रीय झाले होते.

दरम्यान, 13 मे रोजी या तीन मतदारसंघासाठी उत्साहात मतदान पार पडल्यानंतर लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते अशोक पाटील निलंगेकर(Ashok Patil Nilangekar) यांनी बुधवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निलंगा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली. देशमुख यांच्या आशियाना बंगल्यात निलंगेकर यांनी तालुक्यातील आढावा, मतांची टक्केवारी याची सविस्त माहिती दिली. तसेच शिवाजी काळगे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Deshmukh-Nilangekar
Ambadas Danve News : ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचं थेट निवडणूक आयुक्तांना पत्र; म्हणाले,'मोदींच्या सभेसाठी...'

निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी देशमुख यांना विजयाची खात्री देत त्यांना शुभेच्छा दिल्या. लातूर लोकसभेची निवडणूक आणि त्यासाठीची संपुर्ण प्रचार यंत्रणा देशमुख कुटुंबाने राबवली होती. माजी मंत्री आमदार अमित देशमुख(Amit Deshmukh), धीरज देशमुख, वैशालीताई देशमुख आणि स्वतः दिलीपराव देशमुख प्रचारात सक्रीय होते.

जिल्हाभरात काळगेंचे नाव सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचवण्याचे काम देशमुख व त्यांच्या टीमने केले. निलंग्यात अशोक पाटील निलंगेकर यांच्यावर जबाबदारी होती. निलंग्यात काका-पुतण्याचे राजकारण जिल्ह्याला परिचित आहे.

Deshmukh-Nilangekar
Khaire Vs Bhumre News : निवडणूक भुमरे-खैरेंची, पण टेन्शन मात्र विद्यमान अन् भावी आमदारांना!

यावेळी दोघांनीही आपापल्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी जोर लावला होता. त्यानंतरही अशोक पाटील निलंगेकर यांनी दिलीपराव देशमुखांच्या भेटीत विजय काळगे यांच्या विजयाची गॅरंटी दिली. देशमुख- निलंगेकर यांच्या भेटीची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com