Mahavikas Aghadi Rally News : व्यासपीठावर महाविकास आघाडी, मैदानात फक्त ठाकरेंची शिवसेना..

Shivsena : सभेला गर्दी नव्हती का? तर निश्चितच होती, पण यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस कुठेही दिसली नाही.
Mahavikas Aghadi Rally News
Mahavikas Aghadi Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्यातील सत्तातंरानंतर महाविकास आघाडीची पहिली संयुक्त `वज्रमुठ`, सभा आज छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) पार पडली. संपुर्ण राज्याचे या सभेकडे लक्ष लागले होते. ठाकरे गटाने ही सभा यशस्वी व्हावी, यासाठी पुढाकार घेत मराठवाड्यात बैठका, मेळावे घेतले. तीन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सभेला येण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर महाविकास आघाडी एकत्र असल्याचे चित्रही दिसले, मैदानात बसलेल्या गर्दीत मात्र फक्त ठाकरेंची शिवसेनाच दिसली.

Mahavikas Aghadi Rally News
Uddhav Thackeray News : पंतप्रधान ज्या काॅलेजमधून शिकले, त्या संस्थेला अभिमान का वाटत नाही : ठाकरेंचा तुफान हल्लाबोल!

ऐरवी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेला जेवढी गर्दी होती, तेवढीच आज तीन पक्षांची मिळून सभा असतांना होती. त्यामुळे व्यासपीठावर दिसलेली महाविकास आघाडी मैदानात मात्र दिसली नाही ही वस्तुस्थीती नाकारता येणार नाही. त्यामुळे मैदान ओंसडून वाहणार, अतिविराट सभा होणार हे दावे फोल ठरले. महिनाभरापासून ठाकरे गटाचे नेते मराठवाड्यात फिरले, (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते, लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेतल्या.

प्रत्येक जिल्ह्यातून काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेला येण्याचे आवाहन केले. मात्र त्याला या दोन्ही पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळाला असे म्हणता येणार नाही. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐनवेळी प्रकृती खराब असल्याचे कारण देत सभेला उपस्थीत राहणे टाळले. परंतु यातून वेगळा अर्थ काढला जावू नये याची काळजी देखील घेतली. काॅंग्रेसचे अन्य नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांनी हजेरी लावली. त्यामुळे पहायला आणि सांगायला ही महाविकास आघाडीची सभा होती, पण प्रत्यक्षात मैदानात बसलेल्या गर्दीत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिकच होते हे मात्र नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना या सभेला येण्यासाठी फारसा आग्रह केल्याचे दिसत नाही. अन्यथा मैदान आणि बाहेर देखील गर्दी ओसंडून वाहिली असती.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या पहिल्याच संयुक्त सभेतील हे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही. त्यामुळे यापुढील राज्यातील आघाडीच्या संयुक्त सभामध्ये तीन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले तरच खऱ्या अर्थाने या सभा आघाडीच्या सभा ठरतील. सभेला गर्दी नव्हती का? तर निश्चितच होती, पण यामध्ये महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस कुठेही दिसली नाही, हे ही तितकेच खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com