अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा; अन्यथा.... : राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी आक्रमक

सरकार टिकवण्यासाठी कोणाकोणाचा भार उचलणार, असा सवालही त्यांनी फडणवीस यांना केला आहे.
NCP Leader Meet Governor
NCP Leader Meet GovernorSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी माफी मागून चालणार नाही. सत्तार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सत्तार यांना बडतर्फ करा; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला आहे. (Dismiss Abdul Sattar from the Cabinet: NCP demands)

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षाचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कृषीमंत्री सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी निवेदनावर करण्यात आली आहे.

NCP Leader Meet Governor
हर हर महादेव चित्रपटावर न बोलण्याचा राज ठाकरेंचा मनसे प्रवक्त्यांना आदेश

राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भूमिका किती मान्य आहे, हे मला माहिती नाही. सरकार टिकवण्यासाठी कोणाकोणाचा भार उचलणार, असा सवालही त्यांनी फडणवीस यांना केला आहे. अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी भेटीनंतर दिला.

NCP Leader Meet Governor
धक्कादायक ! उद्योगनगरीत अल्पवयीन मुलांकडून पंधरवड्यात दोन खून

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे या प्रकरणावर मौन का आहे. यावर पाटील म्हणाले की, आम्ही सगळे मागणी करत आहेत. ते बहिणी संदर्भात कसे बोलतील. तेही नाराज आणि दुःखी आहेत. ते कौटुंबीक कारणासाठी बाहेरगावी आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

NCP Leader Meet Governor
गुलाबराव पाटील, दोन हात करायला तयार रहा!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विद्यमान कृषिमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकारमधील एक जबाबदार पदावरील व्यक्ती महिलांविषयी असे वक्तव्य करणे हे निषेधार्ह आहे. त्यामुळे महिलांविषयी पातळी सोडून वाश्चाता करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही, या भूमिकेतून पक्षाच्या शिष्टमंडळाने अब्दुल सत्तार यांना तातडीने बडतर्फ करावे अशी राज्यपालांकडे मागणी करण्यात आली.

या शिष्टमंडळात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, रुपेश खांडके यांचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com