क्षीरसागर कुटुंबातील वाद पेटला : गोळीबार, दरोडा प्रकरणाने बीड हादरले

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची जमीन कोणी खरेदी करायची यावरून वाद सुरू झाला..
Kshirsagar family
Kshirsagar familysarkarnama
Published on
Updated on

बीड : जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असलेल्या क्षीरसागरांच्या घरात पाच वर्षांपूर्वी सुरु झालेला राजकीय कलह आता गोळीबार, हत्याराने प्राणघातक हल्ला, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि दरोडा इथपर्यंत पोचला आहे. राजकीय वर्चस्वाला प्रॉपर्टी वादाची लागेली झालर या वादाला कारणीभूत ठरली आहे. यावरुन क्षीरसागर भावंडांसह त्यांच्या पुत्रांवर शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांच्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र जयदत्त क्षीरसागर विधीमंडळ, रवींद्र क्षीरसागर स्थानिक स्वराज्य संस्था व कारखाना, डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे बीड नगर पालिका तर डॉ. विठ्ठल क्षीरसागर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. पुढे पुतणे संदीप क्षीरसागर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकारणात आले.

Kshirsagar family
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा मोदींचा प्रयत्न! हेमा मालिनींचा गौप्यस्फोट

संदीप क्षीरसागर यांना शहराच्या राजकारणात पाऊल हवे होते. यातूनच पाच वर्षांपूर्वी क्षीरसागरांमध्ये काका - पुतणे वाद सुरु झाला. मात्र, शुक्रवारी या वादाचे कलहात पर्यवसान झाले. त्याचे कारण ठरले सहा भुखंडांच्या विक्रीचे. यातून गोळीबार, प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न, लुट असे गंभीर गुन्हे क्षीरसागरांवर दाखल झाले आहेत.

पहिल्या फिर्यादीरुनसार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, पुतणे व डॉ. योगेश क्षीरसागर, सतीश पवार यांच्यासह नऊ जणांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा व जिवे मारण्याचा प्रयत्न अशा कलमांखाली गुन्हे नोंद झाले. तर, दुसऱ्या फिर्यादीनुसार आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडिल गजानन कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, त्यांचे बंधू माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बंधू अर्जुन क्षीरसागर आदींवर कुकरीने प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायदा, साडेपाच लाखांची लूट असे गुन्हे नोंद झाले आहेत.

Kshirsagar family
युक्रेन गुडघे टेकवणार? धुमश्चक्रीनंतर रशियानं दिला प्रस्ताव

शुक्रवारी सकाळी (ता. २५) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सहनिबंधक व मुद्रांक उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे शहरात व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेत जखमी सतीश क्षीरसागर व फारुक सिद्धीकी यांच्यावर सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात उपचार करुन नंतर त्यांना औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले. यातील सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री उशिरा माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, त्यांचे पुत्र माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, सतीश पवार, प्रमोद पवार, विनोद पवार, रवी पवार, आदित्य पवार व इतर आशा नऊ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न व भारतीय हत्यार कायदा अशा कलमाखांली शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तलवार, लाठी - काठ्या, दोन पिस्टल दांडे याद्वारे जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Kshirsagar family
रशिया, युक्रेन युद्धातून काय साध्य होणार; उदयनराजेंनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, याच प्रकरणातील आरोपी सतीश पवार यांच्या भगीनी प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खरेदी केला होता, असे सांगत २५ फेब्रुवारी रोजी त्याचा खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे बंधू सतीश पवार हे सहनिबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी, आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण व इतरांनी रजिस्ट्री का करतो असे म्हणून मारहाण केली, तसेच कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी साडेपाच लाख रुपयांची पैशांची बॅग हिसकावली असे नमूद केले. यावरून दरोडा, प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com