Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

Khaire : पुजा-महायज्ञ केल्याने सरकार पडतं का? आता २७ तारखेला पहा काय होते ?

तुम्ही गद्दार, डुप्लिकेट आणि ढोंगी आहात, अशा शब्दा खैरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. (Chandrakant Khaire)
Published on

औरंगाबाद : पूजा-महायज्ञ केल्याने सरकारे पडत असतात का? असं त्यांचा एक मंत्री मला उद्देशून म्हणाला होता. आता २७ तारखेला बघा काय होते? असा इशारा (Shivsena)शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारला दिला आहे. रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी काही दिवसांपुर्वी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर टीका करतांना ते फक्त पुजा-अर्चा करतात, महायज्ञ करतात, पण अशाने सरकार पडत असतात का? खैरेंनी २५ वर्षा फक्त पुजाअर्चाच केली, विकासकामे केलीच नाहीत, असा टोला लगावला होता.

त्याच्या संदर्भ देत खैरेंनी पुन्हा एकदा भुमरे व शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. (Aurangabad) खैरे म्हणाले, शिंदे सरकारचा फैसला येत्या २७ तारखेला होणार आहे, पुजाअर्चा केल्याने सरकार पडतं असते का? असं मला त्यांच्या एका मंत्र्यांने विचारले होते, आता २७ तारखेला बघा काय होते? शिंदे सरकार फारकाळ टिकणार नाही हे मी आधीपासून सांगतोय.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या फक्त रुद्राक्षाच्या माळा घातल्याने किंवा भेट दिल्याने त्यांच्यासारखे विचार व प्रखर हिंदुत्व अंगी बाळगता येत नाही. तुम्ही डुप्लीकेट आहात, आम्ही ओरिजनल आहोत, असा टोला देखील खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती. आता हे त्यांची काॅपी करतायेत, हिंदू गर्जना यात्रा काढतायेत. पण हा ढोंगीपणा कशासाठी? तुम्ही गद्दार, डुप्लिकेट आणि ढोंगी आहात, अशा शब्दा खैरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Aurangabad : न्यायालयाने फटकारले, उपमुख्यमंत्र्यांनी झापले ; सत्तारसाहेब जरा सबुरीने घ्या..

सत्तेच्या लाचारीसाठी भाजपसोबत गेलात, आता त्याची फळं भोगा. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांनी महाविकास आघाडी सरकराने आणलेला मोठा प्रकल्प आता गुजरातमध्ये गेला आहे. असंच एक एक करून महाराष्ट्राचे तुकडे हे लोक गुजरातला देवून टाकतील, असा गंभीर आरोप देखील खैरे यांनी यावेळी शिंदे सरकारवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com