Beed : शिवाजीराव पंडित म्हणाले, मी तुमचा सालकरी १९६२ पासून राखण करतोय..

नियमित योगा, प्राणायाम, चालणे, आहाराकडे विशिष्ट लक्ष असल्याने आजही त्यांची प्रकृती ठणठणीत व बुद्धी तल्लख आहे. याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमात आला. (Beed News)
Ex. Minister Shivajirao Pandit News,Beed
Ex. Minister Shivajirao Pandit News,BeedSarkarnama

बीड : पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष ते राज्याचे मंत्री असा राजकीय प्रवास करत ५० वर्षे सक्रीय राजकारणानंतर ७५ वर्षानंतर स्वत:हून निवृत्ती स्विकारलेल्या जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांची जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य अशी ओळख आहे. (Beed) ८५ वर्षे पुर्ण करणारे शिवाजीराव पंडित Shivajirao Pandit आजही प्रकृती सांभाळून आणि हजरजबाबी आहेत. त्यांच्या तल्लख बुद्धीचा प्रत्यय त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील उत्तराच्या भाषणात आला.

शिवाजीराव पंडित यांचा ८५ व्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वपक्षीय मंत्री, आमदार, खासदारांची उपस्थिती होती. (Ncp) जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आलेल्या शिवाजीराव पंडित यांनी तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. (Marathwada) विविध खात्यांच्या मंत्रीपदासह विविध समित्या व पक्ष संघटनांतही महत्वाच्या पदांवर काम केले. जिल्हा परिषदेवरही त्यांचे अनेक वर्षे वर्चस्व होते.

स्वाभिमानी राजकारणी, करारी बाणा व दिलेला शब्द पाळणारे अशी ख्याती असलेल्या पंडित यांनी आपल्या पराभवाला हातभार लावणाऱ्या पक्षातीलच दिवंगत अंकुशराव टोपे, दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव होईपर्यंत डोक्यावर टोपी चढविणार नाही असा पण केला होता. भाजपच्या रजनी पाटील यांच्याकडून केशरबाई क्षीरसागरांचा पराभव घडवून आणूनच त्यांनी डोक्यावर टोपी चढविली होती.

वयाची ७५ पार केल्यानंतर १० वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:हून राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. मात्र, सार्वजनिक जिवनात ते कायम सक्रीय असतात. शेतातही अनेक अधुनिक यशस्वी प्रयोग करुन त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी धडे दिले जात आहेत. नियमित योगा, प्राणायाम, चालणे, आहाराकडे विशिष्ट लक्ष असल्याने आजही त्यांची प्रकृती ठणठणीत व बुद्धी तल्लख आहे. याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमात आला.

Ex. Minister Shivajirao Pandit News,Beed
Beed : दोघांची तिरपी टोपी अन् पिळदार मिशा ; पंडितांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यात पाटलांची बॅटींग

मी जास्त बोलणार नाही, बोलून फसल्याची अनेक उदाहरणे असतात. त्यामुळे विनाकारण वाद वाढतात, मला अमरसिंहने देखील काहीही बोलताल असे सांगीतले आहे. पण, मी १९६२ पासून तुमचा सालकरी म्हणून राखन करतोय. जीवन सार्थकी झाल्याची भावना आहे. अनेक पदे मिळाली, एका निवडणुकीत प्रचार न करताही या तालुक्याने मला ६० हजार मतांनी निवडुण दिले.

आपणही विकासाची कामे केली, केज तालुक्यातील नवोदय विद्यालय रात्रीतून गढीला आणले. अनेक विद्यार्थी कर्नल, डॉक्टर, इंजिनीअर झाले. अनेक चढउतार, वाईट अनुभव पाहीले. आपण राजकारणात सासरे दिवंगत बाबुराव पाटील यांच्यामुळेच आल्याचेही त्यांनी सांगीतले. दानवेंनी जळगाव - सोलापूर रेल्वेचे पहावे, अशी मागणी केली. तीनही मुले निर्व्यसनी असून तालुक्यासाठी झटतात, विजयसिंहला आमदार म्हणून पाहण्याची शेवटची इच्छा असल्याचेही पंडित म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com