Bhokar Market Committee News: इच्छुकांची संख्या वाढल्याने चव्हाणांकडून जुन्या संचालकांना थांबण्याच्या सूचना..

Ashok Chavan News: काँग्रेसला फटका बसू नये, सत्ता कायम राहावी यासाठी स्वतः अशोकराव चव्हाण यांनी सगळी सुत्र आपल्या हाती घेतली आहे.
Bhokar Market Committee News
Bhokar Market Committee NewsSarkarnama

Congress News: भोकरसह नांदेड जिल्ह्यातील बाजार समितीच्या (Bhokar Market Committee) निवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी बैठकांचा धडका सुरू केला आहे. इच्छुकांची गर्दी आणि अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे चव्हाण यांनी भोकरमध्ये फेरमुलाखती घेतल्या. त्यातून १८ जागांसाठीची नावे देखील निश्चित करण्यात आली आहेत. मागच्या काळात संचालक असलेल्यांना यावेळी थांबण्याच्या सूचना देखील चव्हाण यांनी केल्या आहेत.

Bhokar Market Committee News
BRS Rally News : मुख्यमंत्री केसीआर यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन अन् उमेदवारीवर शिक्कामोर्तब ?

चव्हाण यांनी तशा सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या असून काल आठ जणांनी माघार घेतली होती. उमेदवारी अर्ज माघारीसाठी फक्त एक दिवस उरला आहे. (Nanded) या पार्श्भूमीवर मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भोकर येथे भेट देऊन इच्छुकांच्या फेरमुलाखती घेतल्या. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून सर्वाधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र अंतिम निर्णय अशोक चव्हाण हेच घेणार आहेत.

फेरमुलाखतीनंतर १८ जागांसाठी चव्हाण यांनी नावे निश्चित केली आहेत. (Congress) काँग्रेसच्या ताब्यात राहिलेल्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपा आणि बीआरएस पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. अंतर्गत नाराजीचा फायदा विरोधकांना होऊन काँग्रेसला फटका बसू नये, सत्ता कायम राहावी यासाठी स्वतः अशोकराव चव्हाण यांनी सगळी सुत्र आपल्या हाती घेतली आहे.

अगदी जिल्ह्यातील निवडणुकीच्या आढावा बैठकीमुळे त्यांनी नागपूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला देखील हजेरी लावली नव्हती. बाजर समिती निवडणुकीसाठी मागील काळात संचालक राहिलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना चव्हाण यांनी केल्याचे समजते.

या निवडणुकीसाठी माजी सभापती जगदीश पाटील भोसीकर, बाळासाहेब रावणगावकर, प्रकाश देशमुख भोसीकर, रामचंद्र मुसळे, पंकज पोकलवार, सारंग मुंदडा, शिवाजी देवतुळे, उज्वल केसराळे, सुभाष चटलावार, सचिन मगरे, मोहन राठोड, प्रल्हाद राठोड यांच्यासह अनेकांनी मुलाखती दिल्या. १८ जागांसाठी तब्बल १ ९ ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीत १६ अर्ज बाद झाले, तर १७६ वैध ठरले होते. सहकारी सोसायटी मतदारसंघातील ६, ग्रामपंचायत मतदारसंघातून १ तर व्यापारी मतदारसंघातून १ असे आठ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com