Anil Jagtap : अनिल जगतापांचं फायनल ठरलं! बीडमधून धनुष्यबाण घेऊनच लढणार...

Beed And Vidhan Sabha Election: प्रत्येक नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ‘भावी आमदार’ असेच लिहलेले असते.
Anil Jagtap
Anil JagtapSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक आणि भावी आमदारांची संख्या बीड विधानसभा मतदारसंघात आहे. विशेष म्हणजे महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही स्पर्धा आहे.

सर्वाधिक इच्छुक आणि २० भावी आमदारांत आपणही असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देशमुखांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणूक धनुष्यबाण हाती घेऊन निवडणूक लढणारच असल्याचे अनिल जगतापांनी फायनल केले आहे.

विकास कामांबाबतच्या पत्रकार परिषदेत शनिवारी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य व आगामी विधानसभा निवडणुकीबाबत ते बोलत होते. महायुतीमध्ये जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात बीडची जागा शिवसेनेची आहे. मात्र, राज्यातील नव्या राजकीय समिकरणानंतर आता बीडच्या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे इच्छुकांची बीडमध्ये भाऊगर्दी वाढली आहे.

प्रत्येक नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ‘भावी आमदार’ असेच लिहलेले असते. आता लोकसभेला भाजपला धोबीपछाड मिळण्यात बीडचा वाटा सर्वात मोठा आहे. बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांना तब्बल ६२ हजारांचे मताधिक्य मिळाल्यानेच त्यांचा विजय सुकर झाला. याउपरही महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांना आपण बीडमधून आमदार होऊ, असा विश्‍वास कायम आहे. विधानसभा निवडणुकीत ही जागा कोणाला सुटणार हे निश्‍चित नसतानाही सर्वजण तयारीला लागले आहेत.

Anil Jagtap
Udayanraje & Shivendraraje : भाजप कार्यालयात दोन्ही राजेंचे फोटो; पदाधिकाऱ्यांतील वाद उफाळण्याची भीती

याबाबत अनिल जगताप म्हणाले, महायुतीमधील एखाद्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला उमेदवारीचा शब्द दिला असला तरी गैर नाही. माझे नेते माझेच नाव पुढे करणार. त्याप्रमाणे इतर नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शब्द दिला असेल. बीडमध्ये भावी आमदारांची संख्या २० असून आपणही एक आहोत. आपण विधानसभा निवडणूक लढणार हे निश्‍चित असून धनुष्यबाणावरच शिवसेनेकडून लढणार आहोत.

Anil Jagtap
Sandipan Bhumre meet Manoj Jarange: संदीपान भुमरेंकडून छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं स्वागत, अन् म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com