Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंना मलिकांचा राजीनामा घ्यायचा होता, पण ते घेवू शकले नाही..

Maharashtra : तेव्हा मंत्रीमंडळात आणि आमदारांमध्ये नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला नाही, याबद्दल रोष होता.
Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Budget Session : बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचे चहापान टळले, असे विधान केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत या संदर्भात खुलासा करत विरोधी पक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे किंवा इतर कुणालाही आपण देशद्रोही म्हटलो नाही, असे स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Cm Eknath Shinde News
Anil Parab News : मुंबईतील दंगलीचा इतिहास तपासा, आम्ही देशद्रोह्यांविरोधात लढलो होतो

राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर एनआयए आणि ईडीकडून देशद्रोहाची कलमं लावून कारवाई करण्यात आली. (Uddhav Thackeray) तरी देखील त्यांचा राजीनामा तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला नाही, हा आपल्या बोलण्याचा उद्देश होता, असेही शिंदे म्हणाले. परंतु या खुलाशानंतरही सभागृहात वादळी चर्चा झाली. विरोधकांनी नवाब मलिक (Nawab Malik) युती सरकार होते तेव्हा देशद्रोही नव्हते का?

त्यानंतर अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि त्यात तुम्ही मंत्री होतात तेव्हा मलिक देशद्रोही नव्हते का? असा आक्षेप देखील अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी घेतला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देतांना काही नव्या गोष्टी सभागृहासमोर आणल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले, तेव्हा अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला. संजय राठोड यांचाही राजीनामा घेतला. तेव्हा मंत्रीमंडळात आणि आमदारांमध्ये नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला नाही, याबद्दल रोष होता. आम्ही अनेक बैठकांमध्ये मलिकांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील मलिकांवर कारवाई करण्याची इच्छा होती, पण ते निर्णय घेवू शकले नाहीत. ते निर्णय का घेवू शकले नाहीत हे परब तुम्हाला देखील चांगले माहित आहे, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांना शांत केले. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर मलिकांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे अशी आमची आणि तुमची देखील इच्छा होती. पण ते का होवू शकले नाही? कुणाचा दबाव होता हे तुम्हाला माहित असल्याने मी या खोलात जात नाही, असेही शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com