Shivsena News: एकनाथ शिंदेंनी परभणीत टाकला डाव, मित्रपक्ष राष्ट्रवादीचाच केला 'करेक्ट कार्यक्रम'; प्रताप देशमुख घेणार 'धनुष्यबाण' हाती

NCP Vs Shivsena: येत्या 30 ऑगस्टला परभणीत हा मेळावा होत आहे. राज्यातील महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच शिवसेनेकडून धक्का देण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे. प्रताप देशमुख यांच्या पक्षांतराची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरूच होती.
Pratap Deshmukh Eknath Shinde  (1).jpg
Pratap Deshmukh Eknath Shinde (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

Parbhani Politics : परभणीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पक्षबदल’चा बॉम्ब फुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील प्रभावी नेते, माजी महापौर प्रताप देशमुख यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

येत्या 30 ऑगस्टला परभणीत हा मेळावा होत आहे. राज्यातील महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच शिवसेनेकडून धक्का देण्यात आल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे. प्रताप देशमुख यांच्या पक्षांतराची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरूच होती. खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर देशमुख यांच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब झाले होते. आता परभणीतील शेतकरी मेळाव्यात याला मुहूर्त लागला आहे.

एकेकाळी अजित पवारांच्या राजकीय छावणीतील आक्रमक शिलेदार म्हणून ओळखले जाणारे देशमुख आता शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार असल्याने या राजकीय ‘पलटी’कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ‘मी अजितदादांसोबतच’ अशी भूमिका सर्वप्रथम जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये देशमुख यांचा समावेश होता.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने परभणी महापालिका निवडणुकीत देशमुख यांच्या राजकीय अनुभवावर मोठी भिस्त ठेवली होती. पक्ष संघटनेपासून निवडणुकीच्या मैदानापर्यंत देशमुख यांनी आपली ताकद दाखवून दिली. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय हालचाली काहीशा मंदावल्या. पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांपासून ते काहीसे दूर राहू लागले आणि त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली.

Pratap Deshmukh Eknath Shinde  (1).jpg
​NCP News: आधी पार्थ पवारांचं दार ठोठावलं, आता थेट पालकमंत्री सुनेत्रा पवारांना साकडं; 'ब्लॅकलिस्ट' करण्यासाठी ZP सदस्यांनी लावली 'फिल्डिंग'

त्यातच काही दिवसांपूर्वी खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि देशमुख यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चेला अचानक वेग आला. जाधव आणि देशमुख यांची मैत्री परभणीच्या राजकीय वर्तुळात नवी नाही. आता दोन मित्र एकाच राजकीय छताखाली येणार असल्याने या मैत्रीला राजकीय ‘इनिंग’ची जोड मिळणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवारांच्या छावणीतून राजकीय प्रवासाला नवी दिशा देत आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे प्रताप देशमुख पुढे कोणती भूमिका बजावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, जाधव - देशमुख मैत्रीची राजकीय जोडी आता नव्या पक्षाच्या व्यासपीठावरून किती रंगते, याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.

Pratap Deshmukh Eknath Shinde  (1).jpg
Beed Court News: संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींच्या वकिलांची कोर्टात धक्कादायक मागणी, सुनावणी पुढे ढकलली

परभणीच्या राजकारणात संजय जाधव आणि प्रताप देशमुख हे दोन परिचित चेहरे आहेत. देशमुख यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला परभणी शहरात एक अनुभवी आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेला चेहरा मिळणार आहे, तर देशमुख यांच्यासाठीही पक्षबदलातून नव्या राजकीय अवकाशाची दारे खुली होणार आहेत.

राष्ट्रवादीसमोर आव्हान

देशमुख यांचा संभाव्य पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी शहरातील संघटनात्मक पातळीवर धक्का मानला जात आहे. अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीसोबत राहिलेल्या या नेत्याने आता शिवसेनेची निवड केल्याने ‘दादांच्या शिलेदाराने आता शिंदेंची साथ का धरली ?’ हा प्रश्नही केंद्रस्थानी आला आहे.

दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा पक्षप्रवेश निश्चित झाला, तर तो केवळ पक्षबदलाचा कार्यक्रम न राहता परभणीच्या राजकारणातील नवी समीकरणे मांडणारा राजकीय ‘टर्निंग पॉइंट’ ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com