Eknath Shinde Beed : भाजप, राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या बीडमध्ये मुख्यमंत्री शिंदे आठवड्यातच दोनदा

Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित असणार
Dhananjay Munde, Eknath Shinde, Devendra Fadnvis
Dhananjay Munde, Eknath Shinde, Devendra FadnvisSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ताकद आहे. मात्र या जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठवड्यात दोनदा येणार आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यात पहिल्यांदाच पाय लागणार आहेत. यातील एकही कार्यक्रम शिवसेनेचा नाही.

जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे मन्मथस्वामी यांच्या कार्तिक पोर्णिमा उत्सवासाठी एकनाथ शिंदेंचा रविवारी दौरा जवळपास निश्चित झाला आहे. प्रशासनाकडून तशी तयारीही सुरु आहे. तर शुक्रवारी (१ डिसेंबर) परळीत शासन आपल्या दारी हा उपक्रम निश्चित झाला आहे. या कार्यक्रमासाठी शिंदे येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रथमच येत असले तरी दोन्ही कार्यक्रम त्यांच्या पक्षाचे नाहीत, हे विशेष.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhananjay Munde, Eknath Shinde, Devendra Fadnvis
Sadabhau Khot : सदाभाऊंचा सरकारला घरचा आहेर; 'या' निर्णयाची होळीच केली !

गेल्या वर्षी दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या अंत्यसंस्काराला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रथम जिल्ह्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत बीडमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम व्हावा, यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, आयोजनासाठी लागणारा निधी प्रशासनाकडे नसल्याने या कार्यक्रमालाच प्रशासनाने नकार कळविला होता. मात्र, धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून कार्यक्रमासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली. आता कार्यक्रमाचे ठिकाणही बीडहून आपले होमपिच असलेल्या परळीला हलविले.

Dhananjay Munde, Eknath Shinde, Devendra Fadnvis
Vivek Kolhe : जायकवाडीच्या संघर्षात आता कपिल सिब्बलांची एन्ट्री ! विवेक कोल्हेंचा मोठा निर्णय

यापूर्वी भाजपच्या विरोधामुळे दोन वेळा रद्द झालेला कार्यक्रम या महिनाअखेर ठरला होता. मात्र, वेळेच्या नियोजनामुळे आता १ डिसेंबरला हा कार्यक्रम निश्चित झाला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित असणार आहेत. आता पक्षाचे मुख्यमंत्री असले तरी धनंजय मुंडेंचे होमपीच असल्याने एकनाथ शिंदेंचे शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी पाहुण्यांसारखेच असणार.

दरम्यान, २६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री शिंदेंची श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पोर्णिमा उत्सावालाही हजेरी लावणार आहेत. श्री क्षेत्र कपिलधार हे विरशैव समाजाचे आद्यगुरु मन्मथस्वामी यांचे समाधीमंदीर आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह तेलंगणा, कर्नाटकातूनही भाविक येतात. मुख्यमंत्री एकाच आठवड्यात दोनदा जिल्ह्यात येत असले तरी यातला एकही कार्यक्रम त्यांच्या शिवसेनाचा नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dhananjay Munde, Eknath Shinde, Devendra Fadnvis
Pune Bribe News : लाचखोर महावितरणच्या अधिकाऱ्याला शॉक! चक्क खोट्या नोटा स्वीकारताना पकडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com