Shivsena News : उद्धव ठाकरेंच्या मोर्चाआधीच एकनाथ शिंदेंचा दौरा; छत्रपती संभाजीनगरमध्ये गटप्रमुखांचा घेणार मेळावा!

Shivsena UBT V/S Shivsena Politics In Marathwada : शेतकऱ्यांचा मोर्चा ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत, तो अधिक ताकदीने आम्ही काढणार आहोत, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
Uddhav Thackeray -Eknath Shinde In Marathwada News
Uddhav Thackeray -Eknath Shinde In Marathwada NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या शेतकरी मोर्च्याआधीच छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत.

  2. शिंदे गटाने गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे.

  3. या दौऱ्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आगामी मोर्च्यापूर्वी राजकीय वातावरण तापले आहे.

Marathwda Political News : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मोर्चा काढणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या या मराठवाडा स्तरीय शेतकऱ्यांच्या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत. 11 आॅक्टोबर रोजीच्या या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. पण या मोर्चाआधीच शिवसेनेचे प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून ते शिवसेनेच्या (Shivsena) गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. कालच शिवसेनेने निवडणुकीसाठीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे स्तंभपूजन करत रणशिंग फुंकले. या निमित्ताने पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे एकत्र आले होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अडीच वर्ष विकासकामे ठप्प झाली होती. लबाडांनो पाणी द्या, हे आंदोलन करणारेच खरे लबाड आहेत. त्यांच्यामुळेच छत्रपती संभाजीनगरकरांना पाण्यासाठी अडीच वर्ष वाट पहावी लागली, असा आरोप संदीपान भुमरे यांनी या कार्यक्रमात केला. तर शिवसेनेच्या मोर्चाचा धसका घेऊनच सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले,परंतु आम्ही शेतकरी कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाच्या मदतीवर ठाम आहोत. शेतकऱ्यांचा मोर्चा ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत, तो अधिक ताकदीने आम्ही काढणार आहोत, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

रामदास कदम यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरू केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच मराठवाड्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दौरे होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा पूर्वनियोजित होता. दसरा मेळाव्याच्या शिवाजी पार्कमधील सभेतच या मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन आणि एकनाथ शिंदे यांचा गटप्रमुखांशी संवाद कार्यक्रम मात्र अचानक ठरला.

Uddhav Thackeray -Eknath Shinde In Marathwada News
Uddhav Thackeray Politics : ओमराजे निंबाळकरांच्या नावाची घोषणाबाजी; उद्धव ठाकरेंनी विचारले, किती पैसे मिळाले? अन् 'तो' किस्साही सांगितला!

उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाआधीच एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन गटप्रमुखांचा मेळावा घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सहाजिकच यावेळी ते उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावरही भाष्य करतील. एकूणच शिवसेनेच्या मोर्चाआधीच एकनाथ शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेऊन कुरघोडीचा प्रयत्न केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

Uddhav Thackeray -Eknath Shinde In Marathwada News
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमधील 'ते' शुल्क रद्द केलं ; म्हणाले, 'दात कोरुन पोट भरत नाही'

मोर्चा अन् कीट वाटप..

एकीकडे उद्धवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांच्या मागणीसाठी मोर्चा काढत आहे. तर दुसरीकडे शिवसेना मराठवाड्यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अन्न-धान्याचे कीट आणि संसारोपयोगी वस्तूंचे तालुकास्तरावर वाटप करणार आहे. राजकीय गोष्टी निवडणुकीत बोलू, विरोधक कटकारस्थाने करतील, इच्छुकांनी डोक्यात मस्ती आणू नये.

एकमेकांच्या विरोधात जावून उट्टे काढू नका, एकदिलाने काम करा,आपत्तीच्या काळात कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी धावून जा, असे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसैनिकांना केले आहे. एकूणच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.

5 FAQs

1. प्रश्न: एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरचा दौरा का करणार आहेत?
उत्तर: उद्धव ठाकरेंच्या शेतकरी मोर्च्याआधी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि गटप्रमुखांचा मेळावा घेण्यासाठी.

2. प्रश्न: या दौऱ्यामुळे राजकीय वातावरणात काय बदल होऊ शकतो?
उत्तर: उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

3. प्रश्न: शिंदे गटाचा मेळावा कधी आयोजित केला आहे?
उत्तर: उद्धव ठाकरेंच्या मोर्च्याच्या काही दिवस आधी हा मेळावा होणार आहे.

4. प्रश्न: या दौऱ्याचा उद्देश काय आहे?
उत्तर: मराठवाड्यात शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध करणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हा प्रमुख हेतू आहे.

5. प्रश्न: उद्धव ठाकरे यांच्या मोर्च्याबद्दल काय अपेक्षा आहेत?
उत्तर: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघणार असून, त्यात राजकीय संदेशही अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com