माझ्या विजयसिंहला एकदा निवडून द्या : शिवाजीराव पंडितांचे भावनिक आवाहन

मी १९६२ पासून गेवराई तालुक्यासाठी सालगड्यासारखे काम केले आहे. आज मी थकलो असलो, तरी तुमची राखण करतो आहे. त्यासाठी माझी तीनही मुले इमानदारीने काम करत आहेत.
Shivajirao Pandit
Shivajirao PanditSarkarnama

बीड : अखेरच्या काळात माझी एकच इच्छा आहे, माझ्या विजयसिंहला (विजयसिंह पंडीत, Vijaysinh Pandit) एकदा निवडून द्या, असे भावनिक आवाहन माजी मंत्री आणि बीड (Beed) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडीत (Shivajirao Pandit) यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना केले. (Elect Vijaysinh Pandit in elections : Shivajirao Pandit)

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. त्या सत्काराला उत्तर देताना पंडीत यांनी आपली इच्छा व्यक्त केली.

Shivajirao Pandit
मुलायम सिंहांच्या निधनाने पंतप्रधान मोदी भावूक; म्हणाले, ‘मनाला वेदना झाल्या...’

शिवाजीराव पंडित म्हणाले की, मी राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सत्कार घेण्याचे बंद केले होते. पण, माझे नेते शरद पवार साहेब येणार आहेत, म्हटल्यावर मला हा सत्कार घ्यावा लागला. मी १९६२ पासून गेवराई तालुक्यासाठी सालगड्यासारखे काम केले आहे. आज मी थकलो असलो, तरी तुमची राखण करतो आहे. त्यासाठी माझी तीनही मुले इमानदारीने काम करत आहेत.

Shivajirao Pandit
भरणेवाडीनं चांगलं मतदान केलं; नाहीतर मी पडलोच असतो : अजितदादांनी सांगितली पहिल्या निवडणुकीची आठवण

हा अभिष्टचिंतन सोहळा पाहून माझे जीवन सार्थक झाल्याचा आनंद होतो आहे. लोकांच्या आशीर्वादामुळेच मी हे करु शकलो. मतदारसंघात शाळा उभ्या केल्या. नवोदय विद्यालय आणले, त्यातून शेकडो मुले देशाच्या विविध भागात काम करत आहेत. ही सारी मुलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आहेत, याचा मला अभिमान आहे, असेही पंडीत यांनी नमूद केले.

Shivajirao Pandit
संजय गायकवाडांचे पुन्हा वाद्‌ग्रस्त विधान; शिवसेनेला आई म्हणता ना?; मग तिला....

माजी मंत्री पंडीत म्हणाले की, राजकारणाचा गुरुमंत्र मला बाबूराव पाटील अनगरकर यांनी दिला, त्यांचे आशीर्वाद मी कधीच विसरु शकत नाही. ते माझे ट्रेनिंग सेंटर होते. आज आपल्या व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. या निमित्ताने जळगाव ते सोलापूर या रेल्वे मार्गाची मागणी आज त्यांना करतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com