Dada Bhuse : संदीपान भुमरे यांच्या खात्याची जबाबदारी 'या' मंत्र्याकडे

Dada Bhuse mp Sandipan Bhumare : संदीपान भुमरे यांच्याकडे मंत्रिपदासोबद संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची देखील जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी मंत्री अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली होती.
MP Sandipan Bhumre
MP Sandipan Bhumre Sarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News : लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मतदारसंघातून शिंदे गटाचे मंत्री संदीप भुमारे विजयी झाले होते. लोकसभेतील विजयानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊन हे खाते कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, सरकारचे अधिवेशन पार पाडले मात्र मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.

संदीपान भुरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खाते होते. या खात्याची जबाबदारी आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचा अतिरिक्त कारभार मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता. 7) ज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या स्वाक्षरीने अधिसूचना जारी केली आहे.

MP Sandipan Bhumre
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंचा दौरा,भाजप नेत्यांची टीका; राऊत संतापले; दिल्ली तुमच्या बापाची आहे का?

संदीपाम भुमरे यांच्याकडे मंत्रिपदासोबद संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाची देखील जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदी मंत्री अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे भुमरे यांनी राजीनामा दिलेल्या रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्याकडे देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याप्रमाणे मंत्री दादा भुसे यांना या खात्याचा अतिरिक्त कार्यभार मिळाला आहे.

चंद्रकांत खैरे यांचा पराभव

लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून ठाकरे गटाकडून चंद्रकात खैरे लोकसभेच्या रिंगणात होते. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. भुमरे यांना उशीरा उमेदवारी जाहीर झाल्याने ते कसे लढत देणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, तिरंगी लढतीमध्ये भुमरे यांनी विजय मिळवला. तर, इम्तियाज जलील दुसऱ्या स्थानावर तर खैरे तिसऱ्या स्थानावर राहिले होते.

MP Sandipan Bhumre
Jayant Patil On Ajit Pawar : "आम्ही जनतेचे रंग घेऊन..."; गुलाबी रंगावरुन जयंत पाटलांचा अजितदादांना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com