उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांवर भाजप नेत्यांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. भाजपची लायकी काय, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. यावर प्रवीण दरेकर यांनी राऊतांना (Sanjay Raut) जोरदार उत्तर दिले आहे.
आमच्या युतीच्या काळात जागा वाटपाचा निर्णय, निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यापासून आत्तापर्यंत 'मातोश्री'वर ठरवली जायची. परंतु आता 'मातोश्री'वरुन बाहेर निघून राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दारात उभे राहण्याची वेळ महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्यावर आणली आहे, असा घणाघात भाजपचे नेते, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर केली आहे.
दानवेंच्या टीकेनंतर राऊतांनी भाजप, भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. 'उद्धव ठाकरे हे दिल्लीत माझ्या घरी आले होते, त्यांनी दिल्लीत यायचे नाही का, दिल्ली का तुमच्या बापाची आहे, अशा शब्दात राऊतांनी सुनावले आहे. भाजपचे नेते, आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही राऊतांच्या विधानावर पलटवार करीत त्यांना खडेबोल सुनावले आहे.
राऊतांनी आपल्या औकातीत राहून बोलावं, त्यांच्या हिशेब आम्हाला मांडावा लागेल. राऊतावर बोलणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, राऊत हे भरकटलेले आहेत. बेताल विधान करणं हा राऊतांचा स्थायीभाव आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.
उद्धव ठाकरे हे तीन दिवसासाठी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘उद्धव ठाकरे तीन दिवसांसाठी दिल्लीत गेले. त्यांना एकच सवाल आहे, ते काँग्रेसवाल्यांची भांडी घासायला गेलेत का?’, असे म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे यांना डिवचलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.