March On Minister Bhumres Residence : अतिक्रमण काढले, आता राहायला घरं द्या; भुमरेंच्या घरावर मोर्चा धडकला..

Guardian Minister : पैठणमधील अतिक्रमण काढल्यामुळे उघड्यावर आलेल्या ६४ कुटुंबांनी हा मोर्चा काढला.
March On Minister Bhumres Residence : अतिक्रमण काढले, आता राहायला घरं द्या;  भुमरेंच्या घरावर मोर्चा धडकला..

VBA News : राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानावर आज वंचित बहुजन आघाडीचा (March On Minister Bhumres Residence) मोर्चा धडकला. पैठणमधील अतिक्रमण काढल्यामुळे उघड्यावर आलेल्या ६४ कुटुंबांनी हा मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानूसार आज ही कुटुंब आणि वंचितचे शेकडो कार्यकर्ते भुमरे यांच्या सुतगिरणी चौकातील निवासस्थानाकडे निघाले होते.

March On Minister Bhumres Residence : अतिक्रमण काढले, आता राहायला घरं द्या;  भुमरेंच्या घरावर मोर्चा धडकला..
Temple land scam News : देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपींना फडणवीसांचे अभय ; तक्रारदाराचे गंभीर आरोप..

पोलिसांना या मोर्चाची पुर्वकल्पना असल्यामुळे त्यांनी अलिकडेच हा मोर्चा रोखला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत थोडी झटापट देखील झाली. त्यानंतर पोलिसांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले आणि त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भुमरेंच्या (Guardian Minister) विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. (Paithan) पैठण मतदारसंघात अतिक्रमण काढल्याने बेघर झालेल्या ६४ कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

भर उन्हात दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) कार्यकर्त्यांनी संदिपान भुमरे यांच्या गारखेडा परिसरात असलेल्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढला. पुंडलिकनगर आणि जवाहरनगर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आधीच तैनात होता. पैठण येथील गट नं. ६ व ७ मध्ये किमान ६४ कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. हे अतिक्रमण काढण्याकरीता स्थगिती मिळाली होती.

याबाबत तेथील रहिवाशी गेल्या १३ वर्षापासुन शासन दरबारी पाठपुरावे करत होती. त्यासाठी त्यांनी उपोषण आंदोलने, मोर्चे केलेली आहेत. मात्र तेथील रहिवाशांची घरे उध्वस्त करून त्यांना शासनाने बेघर करून उघड्यावर आणले, असा आरोप निवेदनात करण्यात आला. सध्या या सर्व कुटुंबांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या ६४ कुटुंबांना शासकीय जागेवर पुनर्वसन करून राहण्याकरीता घर, जागा दयावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com