Sitaram Ghandat Join BJP News : सिताराम घनदाट 'मामा' भाजपमध्ये, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश!

Sitaram Ghandat, former MLA of Gangakhed, joins BJP, which is likely to increase the political headache for current MLA Ratnakar Gutte.अपक्ष, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि आता भाजपमध्ये घनदाट यांची पक्षप्रवेश होत आहे.
Ex MLA Sitaram Ghandat News
Ex MLA Sitaram Ghandat NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राज्यात महायुतीची सत्ता आणि भाजपाचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर इतर पक्षातून आऊटगोईंगचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः मराठवाड्यात इतर पक्षातील मोठे नेते, माजी आमदार, पदाधिकारी भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिताराम घनदाट हे आज भाजपात प्रवेश करत आहेत.

अपक्ष, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि आता (BJP) भाजपमध्ये घनदाट यांची प्रवेश होत आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांची घनदाट यांच्या भाजपा प्रवेशाने डोकेदुखी वाढणार आहे.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केवळ गंगाखेडच नाही तर संपूर्ण (Parbhani) परभणीत जिल्ह्यात सिताराम घनदाट यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाची ताकद वाढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सिताराम घनदाट हे काही माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य यांच्यासह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. सिताराम घनदाट हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा आमदार राहिले आहेत.

Ex MLA Sitaram Ghandat News
Gangakhed Assembly Constituency : गंगाखेड विधानसभा मतदारसंघात डॉ. रत्नाकर गुट्टेंचा झंझावात

अभ्युदय बँकेच्या माध्यमातून घनदाट यांनी सहकार क्षेत्रात मोठे जाळे निर्माण केले आहे. 1994 ते 99 दरम्यान महायुतीच्या व त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात ते अपक्ष आमदार होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले सिताराम घनदाट सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा गंगाखेड या राखीव मतदार संघात निवडणूक लढवली. 2009 मध्ये आरक्षण उठवल्यानंतरही ते दोनवेळा आमदार राहिले.

Ex MLA Sitaram Ghandat News
BJP MP Controversial Statement : सोलापूरकर, कोरटकरनंतर 'या' भाजप खासदाराचं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींचा उल्लेख करत म्हणाले...

तत्कालीन राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांना पराभूत करण्याची किमयाही सिताराम घनदाट यांनी केलेली आहे. 1989 ते 2014 दरम्यान दोनवेळा ते अपक्ष निवडून आले. 2019 आणि त्यानंतर झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सिताराम घनदाट यांना फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. दरम्यान पाच वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

Ex MLA Sitaram Ghandat News
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात पाणी कपात कशासाठी? जायकवाडीचा पाणी प्रश्न पेटणार!

तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीआधी पक्षफुटी नंतर घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला गेल्यामुळे घनदाट यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचा आधार घेत निवडणूक लढवली. पण त्यांचा हा प्रयोग अयशस्वी ठरला, त्यांना 43 हजार 26 म्हणजेच 13.82% एवढी मते मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले विधानसभेला पराभव झाल्यानंतर आता त्यांनी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com