वेल्हे (जि. पुणे) : वेल्हे (Velhe) तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणुकीत (Election) काँग्रेसची (Congress) सरशी झाली असून आमदार संग्राम थोपटे यांचीच हवा असल्याचे निकालातून दिसून आले आहे. सर्वाधिक १३ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत, तर राष्ट्रवादी (NCP) दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना १० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाला २ जागा भारतीय जनता पक्षाला एका ठिकाणी, तर दोन ग्रामपंचायती स्थानिक विकास आघाडीला मिळाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. (Congress won 13 Gram Panchayats in Velhe taluka)
वेल्हे तालुक्यातील सर्वात चुरशीच्या लढत झालेल्या दापोडे ग्रामपंचायतीमध्ये माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर व काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष शिवराज शेंडकर यांच्या पॅनेलला घवघवीत यश मिळाले आहे. पंधरा वर्षांची राष्ट्रवादीची सत्ता काँग्रेसने हिसकावली आहे. धानेप व शिरकोली, कोंडगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीची सत्ता गेली असून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली आहे.
वेल्हे पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर सरपाले यांनी त्यांच्या परिसरातील सोंडे सरपाले, सोंडे हिरोजी सोंडे माथना या ग्रामपंचायतींत घवघवीत यश मिळाले आहे. शिरकोली ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीमध्ये भोर विधानसभा मतदार संघाचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल पडवळ हे विजयी झाले आहेत. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी सभापती संगीता जेधे यांचे पती प्रकाश जेधे यांनी वेल्हे खुर्द ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवली आहे.गुंजवणे ग्रामपंचायतीमध्ये माजी पंचायत समिती सदस्य गुलाब रसाळ हे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे यांच्या लव्ही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत शंकर रेणुसे विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बालवड व जाधववाडी या दोन ठिकाणी सत्ता मिळविता आली आहे. सुषमा बापु शिंदे यांनी बोरावळे ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली आहे. भारतीय जनता पार्टीला एकाच ठिकाणी समाधान मानावे लागले असून स्थानिक आघाडींना दोन ठिकाणी सत्ता मिळविली आहे.
गावाचे नाव - सरपंचाचे नाव - पडलेली मते
१) सोंडे सरपाले - गायकवाड सोपान दिनकर 166
२) सोंडे कार्ला - युवराज बबन कार्ले 146
३) शिरकोली - अमोल भिमराव पडवळ 223
४) हारपुड - कुमकर अंकुश दत्तु 192
५) वेल्हे खुर्द - जेधे प्रकाश मारुती 447
६) कोशिमघर - रमेश किसन कडु 175
७) गोंडेखल - निलेश विठ्ठल कडु 132
८) कोलंबी - शितल अंकुश कोडीतकर 239
९) बोरावळे - सुषमा बापु शिंदे - 203
१०) गुंजवणे - रसाळ लक्ष्मण म्हकाजी - 305
११) केळद - आश्निनी रुषिकेश भावळेकर - 680
१२) मोसे बुद्रुक - किसन बबन बावधने - 91
१३) गिवशी- बाळासाहेब धाऊ मरगळे- 104
१४) वाजेघर बुद्रुक - स्वाती संतोष काबदुले - 332
१५) सोंडे हिरोजी - निवृत्ती एकनाथ जाधव - 167
१६) लव्ही बुद्रुक - शंकर कृष्णा रेणुसे -375
१७) पाल बुद्रुक - निता किरण खाटपे - 326
१८) बालवड- विशाल तुळशीराम पारठे -139
१९) चिरमोडी - अलका विजय गिरंजे - 531
२०) सोंडे सरपाले - पुनम प्रकाश बढे - 298
२१) दापोडे - संदीप चंद्रकांत शेंडकर 673
२२) कोंडगाव - पुनम पांडुरंग दारवटकर 373
२३) धानेप - राहुल सुरेश मळेकर -379
२४) टेकपाळे - मंगल दिनकर बामगुडे 176
२५) आंबेगाव खुर्द - प्रियंका नवलेश पंडीत बिनविरोध
२६) शेनवड - लक्ष्मण दगडु शिंदे बिनवरोध
२७) जाधववाडी - शितल कृष्णा तुपे बिनविरोध
२८) वडघर - सुवर्णा नथुराम डोईफोडे - बिनविरोध
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.