Beed News : शासनाच्या योजनांचा उहापोह करताना सरकार किती शेतकरी व सामान्यांसाठी काम करतय, हे सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पीक विमा अग्रीम बाबत भला मोठा दावा केला आहे. त्यांनी चक्क बीड जिल्ह्यातील 18 लाख शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम दिल्याचे आपल्या भाषणात म्हटले आहे.
मात्र जिल्ह्यात सोयाबीनचा विमा संरक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याच आठ लाख 17 हजार असताना देवेंद्र फडणवीसांनी हा दावा कशाचा अधारे केला असा प्रश्न आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून कायम अडवणूक होते. २०२० व २०२२ सालचा विमाही कंपन्यांनी दिला नाही. यंदाच्या हंगामात पावसाने उघडीप दिल्याने खरीपातील सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्ष दिपा मुधोळ - मुंडे यांनी तीन अधिसुचनांद्वारे जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम मंजूरीचे आदेश दिले.
या विरोधात अगोदर कंपनीने विभागीय आयुक्त तसेच नंतर राज्यस्तरीय नियंत्रण समितीकडे अपील केले. दोन्ही अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनीही सुरुवातीपासून या विषयात लक्ष घातले. दिवाळीत शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. यानुसार दिवाळीत 6 लाख 34 हजार शेतकऱ्यांना 206 कोटी रुपयांची रक्कम वितरतीत करण्याचा दावा कंपनीने केला. मात्र या आकड्यालाही किसान सभेने उघडे पाडले आहे.
दरम्यान, उर्वरित एक लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांची फेरतपासणी केल्यानंतर त्यांना 35 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. विमा अग्रीम भेटला नाही म्हणून हजारो शेतकरी आजही हवालदिल असताना, जबाबदार पदावरील देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 18 लाख शेतकऱ्यांना विमा अग्रीम वाटप केल्याचा दावा केला. यामुळे शेतकरी संभ्रमीत आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.